लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
[00:37.62] लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
[00:51.70] जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
[00:58.73] धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
[01:13.28] एवढ्या जगात माय मानतो मराठी
[01:49.45] आमुच्या मनामनात दंगते मराठी
[01:58.78] आमुच्या रगारगात रंगते मराठी
[02:18.10] आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
[02:25.88] आमुच्या नसानसात नाचते मराठी
[03:28.23] आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
[03:36.77] आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
[03:43.30] आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
[03:48.83] आमुच्या घराघरात वाढते मराठी
[04:02.19] आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
[04:06.21] येथल्या फुलाफुलात हासते मराठी
[04:13.03] येथल्या दिशादिशात दाटते मराठी
[04:20.07] येथल्या नगानगात गर्जते मराठी
[04:30.87] येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
[04:36.90] येथल्या वनावनात गुंजते मराठी
[04:43.71] येथल्या तरुलतात साजते मराठी
[05:03.80] येथल्या कळीकळीत लाजते मराठी
[06:24.94] येथल्या नभामधून वर्षते मराठी
[06:31.22] येथल्या पिकांमधून डोलते मराठी
[06:38.01] येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
[06:44.83] येथल्या चराचरात राहते मराठी
[00:00.00] पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
[00:00.00] आपुल्या घरात हाल सोसते मराठी
[00:00.00] हे असे कितीक खेळ पाहते मराठी
[00:00.00] शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
