Lrc Player

33_adhyay - 27:01:24, 3.26 PM

Unknown artist
[10:05.20]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:02.00] आम्ही मातंग मुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत. ह्या आईची आराधना केल्यास दांपत्यसौख्य चांगले लाभते.

[00:07.31] हिला राजमातंगी कर्णमातंगी वगैरे नावांनी संबोधतात. एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमांत दर्शन दिले.

[00:14.48] त्या वेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती. ज्या गोमातेच्या कातड्यानी ह्या पादुका बनल्या, ती गोमाता सुद्धा मान हालवित समोरून गेल्याने तिला दर्शन झाले.

[00:23.78] श्रीपादांनी आमच्या कडून दूध स्वीकारले. आम्ही पूजलेली मातंगदेवीची मूर्ती, तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानांतील औदुंबरवृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल, आणि तेथे अनेक सिद्धपुरुषांकडून तिची सेवा होईल.

[00:29.89] ते बंगारम्माला बोलावून म्हणाले, "बाई ! तुझा पति खूप अनुकूल आहे. पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल. तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे. तसेच अत्यंत शुभप्रद असे

[00:35.46] मंगळसूत्र पण तयार केलेले आहे. हे दोन्ही हिरण्यलोकांत व्यवस्थितपणे ठेवले आहेत. उत्तर जन्मांत मी

[00:38.39] स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन." एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबांनो ! तुम्ही आमची गाथा ऐकलीत. नेहमी सिद्ध मंगलस्तोत्राचे पठन करीत रहावे, तुम्हाला

[00:41.84] महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. सिद्ध, महासिद्ध, महायोगी हे श्रीपादांचे करचराणावयवासारखेच होय, त्यांच्या कडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ति करतात. एकदा त्यांनी राजमाता

[00:45.82] मातंगीदेवीच्या रूपांत दर्शन देऊन आम्हास अनुग्रहीत केले. समस्तसृष्टी, तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते. तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा, ध्यान करा, अर्चना करा. सर्वसिद्ध तेच आहेत.

[00:46.89] माते प्रमाणे ते तुमची रक्षा करतील. कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्चकोटीचे असते.