Bagh ughaduni daar
[00:16.04] शोधून शिणला जीव आता रे
[00:20.32] साद तुला ही पोचंल का
[00:23.77] दारोदारी हुडकंल भारी
[00:28.02] थांग तुझा कधी लागंल का
[00:31.49] शाममुरारी, कुंजविहारी
[00:35.49] तो शिरीहारी भेटंल का
[00:39.48] वाट मला त्या गाभाऱ्याची
[00:43.20] आज कुणी तरी दावंल का
[00:46.38] बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
[01:41.43] तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
[01:45.16] नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
[01:49.15] तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
[01:52.88] शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
[01:56.85] रोज वृंदावनी फोडी जो घागरी
[02:00.57] तोच नाथा घरी वाहातो कावडी
[02:04.55] गुंतला ना कधी मंदिरी राउळी
[02:08.54] बाप झाला कधी जाहला माऊली
[02:12.52] भाव भोळा जिथे धावला तो तिथे
[02:16.25] भाव नाही तिथे सांग धावंल का
[02:20.50] बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
[03:18.69] राहतो माउलीच्या जीव्हारात जो
[03:22.67] डोलतो मातलेल्या शिवारात तो
[03:26.71] जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो
[03:30.42] दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
[03:34.15] नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
[03:38.12] होई काठी कधी आंधळ्याच्या करी
[03:42.10] घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
[03:45.82] तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
[03:49.90] राहतो तो मनी , या जनी जीवनी
[03:53.88] एका पाषाणी तो सांग मावंल का
[03:57.61] बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?
