Adhyay_30
[00:04.02] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:08.27] अध्याय -३०
[00:09.65] ''श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान''
[00:11.82] निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीचसांगितले
[00:15.28] नाथ संप्रदायाप्रमाणे, जीव, चौसष्ट शाबर तंत्राचा उपयोग करून
[00:20.33] परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उध्दार करून घेतो.
[00:24.58] नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत.
[00:28.84] आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत.
[00:33.63] बुध्दीबळाच्या पटावर चौंसष्ट घरे असतात.
[00:36.82] श्रीमहाविष्णु श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठलोकांत बुध्दिबळाचा डाव खेळतात
[00:42.39] याचा गुढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या
[00:46.64] निरनिराळया जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ
[00:49.56] आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत,
[00:53.01] त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात.
[00:57.54] दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता
[01:00.99] मानवाच्या अध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारीत असतो.
[01:06.03] प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते.
[01:09.24] या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योगपध्दति,
[01:12.47] मंत्रजप, यज्ञयागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे
[01:16.99] इत्यादी पध्दतीचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी.
[01:22.30] या प्रकाशावर नाडीशुध्दि अवलंबून असते.
[01:25.48] नाडीशुध्दीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळया शारिरीक,
[01:29.49] मानसीक, अध्यात्मिक शक्तीची प्राप्ति होते.
[01:32.68] त्या त्या शक्तींचा विकास झाला
[01:34.54] म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो.
[01:40.12] श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले
[01:42.25] ''शंकरभट्टा, भविष्यात माझे महासंस्थान
[01:45.16] श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल.
[01:48.12] श्रीपीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार
[01:52.63] हे तिन्ही मिळून एक महानगर होईल.
[01:55.02] माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल.
[01:59.54] कलियुगात अनेक आश्चर्ये घडतील.
[02:02.19] वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक
[02:05.88] श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पूजारी नेमला जाईल.
[02:09.34] त्याच्या बरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही.
[02:13.32] क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील.''
[02:17.57] असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले.
[02:20.76] ते पहाण्यास सहस्त्रावधि जन्म सुध्दा अपुरेच पडतील.
[02:24.26] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
