Lrc Player

Adhyay_26

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[05:27.80]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.83] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:08.14] अध्याय -२६

[00:09.32] कलीयुगाचे लक्षण

[00:11.18] आम्ही प्रात:काळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो.

[00:16.75] धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती.

[00:23.67] आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते.

[00:26.85] त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृत दृष्टी

[00:30.09] साऱ्या साधकांना एका अगळया वेगळया अध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती.

[00:35.24] प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो.

[00:38.95] श्री धर्मगुप्तांनी, श्रीपादांना, कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष

[00:43.29] वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली.

[00:45.94] श्रीपाद प्रभू म्हणाले ''साधकानों, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे.

[00:51.51] सूर्याला कालात्मक असे सुध्दा म्हणतात.

[00:54.43] धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा

[00:59.80] परत फिरुन धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात.

[01:04.95] ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टीकल्प असे म्हणतात.

[01:08.66] आणि उरलेल्या भागास प्रलय कल्प असे म्हणतात.

[01:12.12] पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धाभाग शुक्लपक्ष

[01:16.53] आणि अर्धाभाग कृष्णपक्ष असे असतात.

[01:19.55] संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण

[01:22.75] आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात.

[01:26.20] संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात.

[01:30.07] या रहस्य विद्येला तारक राजविद्या असे म्हणतात.

[01:33.64] तारक राजयोगात शरिरालाच ब्रह्मांड मानतात.

[01:37.09] समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात.

[01:43.47] या शिरस्थानात आचार विचार असतात.

[01:46.39] नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो.

[01:50.90] पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्युदेवता स्वरूपात वास करतात.

[01:55.16] या जन्युदेवतांचे कार्य असे की मानवाच्या गत जन्मात केलेल्या कर्माचे फळ

[02:00.56] पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ

[02:04.27] एका क्रमपध्दतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते.''

[02:08.78] कलियुगाचे लक्षण

[02:10.63] पितृदेवता म्हणजे आपले दिगंवत झालेले पूर्वज नव्हे.

[02:14.36] स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता-पिता, आजी आजोबा

[02:17.87] यांच्या नांवाने आपण केलेल्या श्राध्दपक्षाचे फळ स्विकारून

[02:21.53] त्याना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्युदेवताच असतात.

[02:25.52] या जन्यु देवतांना जन्म नसतो.

[02:27.90] योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतुंचे दर्शन करतात.

[02:32.22] एका वर्षात बारा पौर्णीमा आणि बारा अमावास्या असतात.

[02:36.04] हे चोवीस पर्वच गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात.

[02:39.76] कालस्वरूपी श्री विष्णु भगवानांना कांही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात.

[02:46.14] या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात.

[02:49.59] प्रत्येक महिन्याचे एक अक्षर या प्रमाणे

[02:52.24] बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो.

[02:56.23] नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य, पशु, संपत्ती यांची अपार हानी होणे,

[03:01.87] भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे, सूर्य, चंद्राची गती बदलणे,

[03:07.12] दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात ''धूमकेतू'' तारा दिसणे

[03:12.33] ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत.

[03:14.56] द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर

[03:19.25] कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती.

[03:23.32] हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात.

[03:27.57] म्लेंछ जातीचा आविर्भाव

[03:29.70] जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार,

[03:32.52] यज्ञ यागादी तपस्या याचाच जोर सर्वत्र चालू होता.

[03:36.34] या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दु:ख झाले.

[03:39.52] त्याने भगवंताची प्रार्थना केली ''हे प्रभो, पृथ्वीवर सगळी कडे

[03:44.48] यज्ञ, याग, धार्मिक आचरण, नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे.

[03:48.56] अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू.

[03:52.88] आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे

[03:57.23] परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत आहे.''

[04:00.68] कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत्प्रभूंनी कलियुगास

[04:04.93] पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले.

[04:07.85] म्लेंछ जातीचा मूलपुरुष आदम आणि स्त्री हव्यावती

[04:11.22] या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले

[04:14.14] त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले.

[04:18.91] वास्तविक पहाता ते स्त्री पुरुष भाऊ-बहीण होते.

[04:22.11] परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून

[04:26.25] त्यांच्यात काम भावनेचे बीज पेरले.

[04:29.01] आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरीत केले.

[04:32.20] ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर

[04:35.02] त्यांच्यातील दिव्य शक्ति अदृष्य झाली.

[04:37.51] कालांतराने या जोडीपासून कलिधर्मांच्या मूळ म्लेंछ जातीचा अविर्भाव झाला.

[04:42.71] द्वापारयुगाच्या अंति म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर

[04:47.08] म्लेंछ देशात म्लेंछ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे

[04:52.38] भविष्य पुराणातील प्रत्येक सर्गपर्वात कथन केले आहे.

[04:55.47] नीलांचल पर्वता जवळ आदम आणि हव्यावती

[04:58.82] या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी,

[05:03.50] अभक्ष्य भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली.

[05:08.38] श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''मी कल्कि अवतार घेऊन

[05:11.46] कोटयावधि अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून

[05:15.18] पुनरपि सत्य युगाची स्थापना करणार आहे.

[05:18.10] हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे.''

[05:21.02] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥