Lrc Player

Adhyay_27

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[05:46.66]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.02] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:08.08] अध्याय -२७

[00:09.67] पंचदेव पहाड प्रांतात विरुपाक्षाची भेट

[00:12.85] श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलिकडील तिरावर पोहोचलो,

[00:16.84] ती मध्यान्हीची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता.

[00:20.56] गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारीत.

[00:24.88] असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्ह वेला होती.

[00:29.22] पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी

[00:32.57] असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता.

[00:34.80] ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुध्दा ते म्हणाले होते.

[00:38.78] परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता.

[00:42.76] कुटी बांधण्यास सोयिस्कर जागा हवी होती.

[00:45.60] बांधकामाचे साहित्य गवत, काठ्या दोऱ्या, पाने

[00:49.57] इत्यादि काहीच वस्तु आमच्या कडे नव्हत्या.

[00:52.06] कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुध्दा तेथे नव्हते.

[00:55.41] पंचदेव पहाड स्थानाचे महत्व

[00:58.87] कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता.

[01:01.43] या परिसरात आम्ही वाटसरु प्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो.

[01:05.14] फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो.

[01:08.23] तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता.

[01:11.97] शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता

[01:15.50] आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरिता घालून ठेवली होती.

[01:20.03] त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले.

[01:24.44] आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेजलेलेच होतो.

[01:27.99] शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही

[01:30.72] ही शंका आमच्या मनांत क्षणभर डोकावून गेली.

[01:33.47] तेंव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला,

[01:35.77] आमची जनावरे चोरुन नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला

[01:39.64] शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का ?

[01:43.20] त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो.

[01:46.40] परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले.

[01:49.31] त्या शेताच्या मालकाचे नांव विरुपाक्ष असे होते.

[01:52.50] भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका-एका झाडास बांधण्यात आले.

[01:56.48] मी एक गरीब ब्राह्मण आहे. माधुकरी मागून आपला उदर निर्वाह करतो

[02:00.89] असे अत्यंत दीनवाणीने त्यांना सांगितले.

[02:03.66] माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुध्दा पुन्हा सांगितले.

[02:07.10] या नंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल

[02:11.53] अशा विचाराने त्यांच्या कडे गेले

[02:13.82] आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकाऊन ध्यावे अशा विचारात होते.

[02:18.17] मश्रीपाद प्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला

[02:22.06] आमची सत्यस्थिती परोपरीने समजाऊन सांगितली,

[02:25.16] तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही.

[02:28.70] त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे ते सुचत नव्हते.

[02:33.66] त्याच वेळी एक यात्रेकरूंचा घोळका (तांडा) तेथे आला.

[02:36.85] या यात्रेकरूंमध्ये ''शिवकावडी'' नावाचा एक भक्त समुदायात होता.

[02:40.57] हे यात्रेकरू वासविकन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात.

[02:44.81] हे भक्तगण त्रिपुंडगंध लावतात. घंटानाद करीत,

[02:48.69] श्री कन्यका परमेश्वरीची स्तुतीभरित गीते गात आपले मार्गक्रमण करतात.

[02:53.58] गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी

[02:56.92] किंवा वासवि मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात.

[03:01.55] या यात्रेकरूमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात.

[03:05.00] त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो.

[03:07.66] या पट्टयामध्ये तलवार, कवच, आणि विविध प्रकारची युध्दाची शस्त्रे असतात.

[03:12.44] या लोकांच्या समुदायास ''वीरमुष्टि'' असे नांव आहे.

[03:16.16] हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात.

[03:19.35] त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना

[03:22.34] आणि वीरमुष्टि लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला.

[03:25.90] त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा

[03:31.10] असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला. आम्ही कामास लागलो.

[03:34.94] सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षाने आम्हास प्रश्न केला,

[03:38.92] ''मुष्ठीतील मुष्ठी वीरमुष्ठी याचा अर्थ काय ?''

[03:41.84] आम्हास तो अर्थ माहित नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले.

[03:45.56] त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुध्दा त्याने आम्हास दिले.

[03:49.01] गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तेथेच झोपावे

[03:52.73] असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले

[03:54.85] नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्या बरोबर हसत खेळत निघून गेला.

[03:59.37] त्या रात्री आम्ही मध्यरात्री पर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण

[04:03.95] आणि दिव्य लीलांचे स्मरण करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली

[04:08.10] सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो.

[04:11.82] आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या.

[04:14.32] आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले

[04:16.97] की ती जागा त्यांनी किती किंमतीस विकत घेतली.

[04:19.89] आम्ही काल घडलेला वृतांत त्याना संपूर्णपणे सांगितला,

[04:23.62] परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेडयातच काढले.

[04:26.80] आमच्या मनांत एकच प्रश्न सतत घोळत होता

[04:29.72] काल पाहिलेले दृष्य खरे का हे दिसत असलेले खरे.

[04:33.44] अशा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित गृहस्थ आला.

[04:37.69] त्याने आम्हास विचारले ''श्री वासविकन्यका देवीचा जन्म

[04:41.46] वैशाख शुध्द दशामीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला ?''

[04:45.72] या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले,

[04:49.52] ''श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुध्द दशमीच्या दिवशी

[04:53.41] मध्यान्ह समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता.''

[04:56.97] हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, ''तुम्ही दोघे वेडे आहात.''

[05:01.48] त्या गृहस्थाने श्रीपाद प्रभू बद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत.

[05:06.26] परंतु कुरुगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो.

[05:11.04] आमच्या दोघांकडे नावडयास देण्यास पैसे नव्हते

[05:14.50] ही गोष्ट आम्ही नावाडयास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली,

[05:17.69] त्यामुळे नावाडयाला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले.

[05:21.67] नाव चालू झाल्यावर नावाडयाची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली.

[05:26.72] त्याने ती काढून घेतली परंतु स्वत:जवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली.

[05:32.29] आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोहोचलो

[05:34.95] त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते.

[05:41.24] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥