Lrc Player

Adhyay_32

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[07:50.60]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.93] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:08.14] अध्याय -३२

[00:09.73] नवनाथांचे वर्णन

[00:11.33] नवनाथांचा वृतांत

[00:13.45] श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला

[00:18.77] ''महाप्रभू ! नवनाथ या नांवाने प्रसिध्द असलेले सिध्द योगी

[00:23.01] सर्व श्रीदत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते.

[00:26.73] त्यांच्या विषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना.''

[00:31.51] श्री नवनाथांचे नांव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून

[00:36.31] अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्या सारखे वाटले.

[00:41.10] त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होते.

[00:44.82] ते अत्यंत आनंदाने म्हणाले

[00:46.94] ''श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग,

[00:54.91] भर्तरि, चर्पट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत.

[00:59.42] त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफल सिध्द होते.

[01:02.88] श्रीदत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते.

[01:07.40] कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उध्दवासारख्या महान भक्ता बरोबर

[01:12.92] तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून,

[01:16.05] आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले.''

[01:21.36] ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते.

[01:24.28] त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात.

[01:29.01] त्यांची नांवे 1) कवि 2) हरी 3) अंतरिक्ष 4) प्रबुध्द 5) पिप्पलायन

[01:35.38] 6) अविर्होत्र 7) दुमिल 8) चमस 9) करभाजन अशी होती.

[01:40.96] हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिध्दपुरुष होते.

[01:45.21] माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म संस्थापनार्थ

[01:50.00] नवनाथ या नाम रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला.

[01:53.67] प्रथम पुत्र कवि हा ''मच्छेंद्रनाथ'' या नांवाने जन्मला.

[01:57.92] अंतरिक्ष ''जालंदर'' नांवाने जन्मला.

[02:00.84] यांच्या शिष्य रूपाने प्रबुध्द ''कनिफा'' या नावाने जन्मला,

[02:05.09] पिप्पलायन ''चर्पटनाथ'' या नांवाने जन्मला.

[02:08.54] अवर्होत्र हा ''नागेश नाथ'' या नांवाने जन्मला.

[02:11.94] दृमिल हा ''भर्तरिनाथ'' या नांवाने जन्मला.

[02:15.39] चमस, ''रेवणनाथ'' रूपाने आणि कारभाजन ''गहनीनाथ'' या नांवाने जन्मला.

[02:20.96] सृष्टीवर अनेक स्थानी कांही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले.

[02:25.75] त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील

[02:28.37] असे व्यास महर्षिंनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते.

[02:32.35] उपरिचर नावाचा एक वसु होता.

[02:34.68] त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला.

[02:38.94] त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले.

[02:42.39] ते एका मासोळीने गिळले.

[02:44.24] ह्या मत्स्या पासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला.

[02:47.44] कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले.

[02:52.75] त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता.

[02:56.46] बृहद्रथाने जेंव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंदर नाथांचा अविर्भाव झाला.

[03:02.58] रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी.

[03:05.76] या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिध्दांचा जन्म झाला.

[03:10.55] एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले

[03:14.00] ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले.

[03:16.92] त्या योगाने ती नागीण गर्भवती झाली.

[03:19.58] त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग, सर्पाना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता.

[03:25.95] ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारा बरोबर शेकडो सर्प नाग यज्ञ कुंडात येऊन पडू लागले.

[03:31.27] या महा भयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी

[03:34.45] तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपविले गेले.

[03:38.96] त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्याने

[03:42.42] त्या अंडयास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली.

[03:46.41] यथासमयी त्या अंडयातून वटसिध्द नागनाथाचा जन्म झाला.

[03:50.92] मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता.

[03:55.97] त्यांच्या दर्शनसाठी अनेक लोक येत असत.

[03:58.89] एक वांझ स्त्रीने मच्छेंद्रनाथाना नमस्कार केला

[04:02.07] व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले.

[04:06.33] परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरडयावर फेकून दिले.

[04:10.31] त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला.

[04:16.15] पार्वतीच्या विवाह समयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव

[04:20.14] तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला.

[04:25.71] या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली

[04:28.64] आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले.

[04:31.56] त्या क्षणीच त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले

[04:35.01] आणि त्यातून वालखिल्य या नांवाचे साठ हजार ऋषी जन्मास आले.

[04:38.96] त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागिरथी नदीत फेकला गेला.

[04:44.26] तो कचरा, नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला.

[04:47.72] त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चर्पटनाथाचा जन्म झाला.

[04:52.50] कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना

[04:56.22] आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले .

[04:59.41] त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षिंना कळाले.

[05:04.19] त्यांनी ते पात्र तेथेच संभाळून ठेवले

[05:06.58] ''भर्तरि'' या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो.

[05:10.29] त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला

[05:13.22] यामुळे त्यांचे नांव भर्तरिनाथ असे पडले.

[05:16.41] हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता.

[05:21.14] एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले

[05:24.32] आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले.

[05:27.24] ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले.

[05:29.63] त्या कानातूनच प्रबुध्दाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला.

[05:34.15] कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नांव कर्ण कनिफा असे पडले.

[05:38.93] गोरक्षकाने संजिवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली.

[05:44.51] त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजिवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले

[05:49.56] आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवातर धारण केला.

[05:53.55] श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणानी आपले स्थूल शरीर

[05:58.02] मंदपर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले

[06:01.74] आणि अंशअवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला.

[06:05.67] धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता.

[06:11.77] श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून

[06:17.36] आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो.

[06:20.01] आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जयजयकार केला.

[06:23.73] यानंतर मी प्रश्न केला

[06:26.12] ''प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशअवतार आहेत

[06:30.57] असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण

[06:34.05] यामध्ये कांही फरक आहे काय ?'' आमच्याकडे आपल्या दिव्य, प्रेमळ दृष्टीने पहात

[06:39.06] श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले आणि म्हणाले

[06:42.20] ''श्रोत्यानो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे.

[06:47.20] देविदेवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुध्दा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात.

[06:53.04] या अंशमात्र संकल्पांना थोडे फार स्वातंत्र्य असते.

[06:57.03] हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस

[07:00.66] चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे.

[07:04.39] तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते.

[07:09.13] संकल्प मात्र मूळ तत्त्वातूनच येतात.

[07:12.58] त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतरातले कार्य असते.

[07:16.84] कोणतीही समस्या निर्माण झाल्यास

[07:18.92] अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्त्वाकडे निवेदन घेऊन येतात.

[07:23.97] मूलतत्त्वाकडून अनुमति घेऊन जीवांचे कल्याण करतात.

[07:28.21] या अंशावतारात, राग, लोभ, मद-मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात.

[07:34.59] यामुळे मूलतत्त्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुध्दा आढळते.

[07:39.10] या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात कांही फरक नसतो.''

[07:45.22] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥