Adhyay_37
[00:03.27] ।। श्री गुरवे नमः ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।
[00:08.36] अध्याय - ३७
[00:09.54] छिन्नमस्तादेवीचे वर्णन
[00:11.65] बंगारय्या व बंगारम्मा यांचा निरोप घेऊन,
[00:15.16] त्यांनी दिलेल्या चर्मपादुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला.
[00:19.40] आम्ही एका अरण्यातून चाललो होतो.
[00:21.26] जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो.
[00:24.45] तेवढ्यातच काही योगिनीगणांचा घोळका तेथे आला.
[00:27.52] त्यांनी आम्हाला पाहून म्हटले, "आता सायं संध्येची वेळ आहे.
[00:31.77] यावेळी आपण या प्रातांत येऊच नये.
[00:34.17] येथे आम्ही छिन्नमस्तादेवीची पूजा करणार आहोत. ही फार रहस्यमय देवता आहे.
[00:39.21] येथे पुरुषांना प्रवेश नाही. एवढेच नव्हे तर ही दैवभूमी आहे.
[00:43.64] येथे आलेला कोणीही जीवंत बाहेर पडत नाही
[00:46.65] हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला.
[00:50.65] त्याच वेळी एका तेजोमयी योगिनी मातेचे तेथे आगमन झाले.
[00:54.62] तिचे नेत्र अग्नि सारखे लाल होते.
[00:57.01] तिच्या बरोबर आलेल्या योगिनींनी एका टोपलीत छिन्नमस्तादेवीला ठेऊन बरोबर आणले होते."
[01:02.32] तेंव्हा ती योगिनी माता म्हणाली, "यांना नेसायला साडी आणि चोळी द्या."
[01:07.01] तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्रे दिली
[01:09.76] आणि आमच्या वस्त्रांना तेथे प्रज्वलित केलेल्या अग्नि कुंडात घातले गेले.
[01:14.01] आम्ही साडीचोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला.
[01:18.01] आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले.
[01:20.65] उरोज पुष्ट झाले, सारे पुरुषत्व नष्ट होऊन स्त्रीरूप प्राप्त झाले.
[01:25.17] आमचे नांव नविन प्रकाराने ठेवण्यात आले.
[01:27.82] माझे नांव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नांव धर्मम्मा असे ठेवण्यात आले.
[01:32.60] आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले. पिण्यास मदिरा दिली गेली.
[01:37.39] दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे
[01:41.43] संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते.
[01:44.33] परंतु या प्रमाणे देवता पूजा असते
[01:46.88] किंवा योगीजन केवळ संकल्पाने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात
[01:51.23] असे आम्हास स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
[01:53.63] आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करविण्यात आले.
[01:56.82] तेवढ्यात योगिनी माता म्हणाली
[01:58.94] "कबंध मुनि हे परिवर्तनशील जगताचे अधिपति आहेत.
[02:02.39] परिवर्तन शक्तिलाच "छिन्नमस्ता देवी" असे म्हणतात.
[02:05.84] या जगतात वृद्धि आणि क्षय सर्वदा चालूच असतो.
[02:10.10] क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो
[02:13.81] त्यावेळी भुवनेश्वरी देवीचे प्रागट्य होते.
[02:16.90] या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकास वृद्धि कमी झाल्यास
[02:20.62] 'छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते. या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे.
[02:26.20] एके वेळी पार्वती देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती.
[02:31.40] स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली त्यामुळे त्या कृष्णवर्णा झाल्या.
[02:36.99] भोजनाची याचना केली तेंव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगण्यात आले.
[02:41.50] थोडा वेळ झाल्यावर सखींने पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली.
[02:45.22] या वेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले.
[02:48.14] असे अनेक वेळा झाले तेंव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या खड्गाने मस्तक तोडून टाकले.
[02:53.08] त्यावेळी कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या.
[02:56.56] दोन धारा तिने दोघी सखींना पिण्यास दिल्या आणि एका धारेचे स्वतः प्राशन केले.
[03:02.13] मस्तक छेदन केल्यामुळे तिला छिन्नमस्ता म्हणतात.
[03:05.32] अर्धरात्री केलेली छिन्नमस्तादेवीची उपासना फार चांगले फळ देते.
[03:10.10] शत्रूवर विजय मिळविण्यासाठी, शत्रुच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी,
[03:15.14] राज्य प्राप्तिसाठी, दुर्लभ अशा मोक्ष प्राप्तिसाठी तिची उपासना अत्यंत फलदायी ठरते.
[03:21.25] चारी दिशा या महामायेची वस्त्रे आहेत.
[03:24.18] तिच्या नाभीस्थानात योनिचक्र असते.
[03:26.84] कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण.
[03:31.08] या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्या बरोबर सतत असतात.
[03:35.07] तिने आपले शिर खंडन केले तरी सुद्धा ती सजीवच राहिली
[03:39.05] याचा योग भाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचे प्रतिक आहे.
[03:44.36] अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्तादेवीचे ध्यान योगीजन करीत असतात.
[03:49.41] ही हिरण्यकश्यपूची उपास्य देवता आहे.
[03:52.60] आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता.
[03:56.58] इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली.
[03:58.97] चित्र- विचित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले.
[04:01.89] यात प्रामुख्याने वाघाच्या डरकाळयांनी आमचा थरकाप झाला.
[04:05.24] वाघाच्या आवाजाने तो शांत असलेला आसमंत एकदम दणाणून जात होता.
[04:10.02] दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असे योगिनी गणांना वाटले.
[04:14.00] त्यांच्या सांनिध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणे अत्यंत श्रेयस्कर आहे
[04:18.48] असे त्यांना वाटले. आमच्या डोक्याला त्यांनी कडुलिंबाची पाने बांधली.
[04:22.63] कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला.
[04:25.27] चांगल्या धारदार चाकूने आमचा शिरच्छेद करण्यात आला.
[04:28.72] रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या पाहून योगिनी गणांना आनंद झाला.
[04:33.25] मदोन्मत्त होऊन त्या रक्तपान करू लागल्या.
[04:36.17] आमची शिरे एका बाजूस आणि धड एका बाजूस टाकण्यात आले.
[04:40.15] तरी सुद्धा आम्ही सजीवच असल्या प्रमाणे वाटत होतो.
[04:43.60] शरीराचा दाह मात्र असहनीय होता.
[04:46.53] त्या योगिनी गणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्र विद्येला आम्ही बळी पडलो होतो.
[04:52.10] तेवढ्यात आम्हास गाढ झोप लागली. त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट
[04:56.78] अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोत दिसला.
[04:59.88] तो प्रकाश आम्हास जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे
[05:03.14] योगिनी गणाच्या वाऱ्यात मिसळून गेल्या प्रमाणे वाटला.
[05:06.40] आमची शिरे पुन्हा आमच्या धडांना येऊन चिटकली असे वाटले.
[05:09.70] आम्ही नेहमी प्रमाणे झोपेतून जागे झालो.
[05:12.36] आमच्या अंगावर साडी, चोळी होती.
[05:14.65] नंतर आमची स्त्री लक्षणे हळू हळू लोप पावू लागली.
[05:17.94] आणि पुरुष लक्षणे स्पष्ट होऊ लागली.
[05:20.59] रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्रे दग्ध होऊन
[05:23.78] आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली.
[05:26.70] स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली.
[05:29.89] एवढ्यात एक वाटसरू आमच्या मध्ये येऊन मिळाला.
[05:32.55] तो आम्हास म्हणाला
[05:34.40] "मित्रानो, काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे.
[05:38.92] तुमच्या शरिरातील 'स्त्री' तत्त्व अत्यंत शुद्ध करण्यात आले.
[05:42.64] प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्त्व अशी दोन्ही तत्त्वे असतात.
[05:46.63] या दोन्ही तत्त्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगशक्ति, विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही.
[05:52.47] तुमच्यातील विश्वचैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे.
[05:56.99] आत्म्याला स्त्री, पुरुष असा भेद नसतो.
[05:59.90] तो या दोन्ही तत्त्वांच्या आधाराच्या अतीत आहे."
[06:02.72] तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने
[06:08.09] अनुपमेय अशी करूणा प्राप्त करून घ्याल.
[06:10.86] कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी सुषुम्नामार्गाची तुम्हाला ओळख झाली.
[06:16.96] यापेक्षा महान भाग्य ते कोणते ? एवढे महाभाग्य प्राप्त होण्याचे कारण म्हणजे
[06:22.28] तुमच्या जवळ असलेल्या श्रीपादप्रभुंच्या चर्मपादुकाच होत.
[06:25.99] चर्म देहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रवाहरूप असलेल्या दिव्यत्वाच्या अनुसंधानात आहात.
[06:32.53] श्रीपाद प्रभुंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात.
[06:36.26] त्या इतर सर्वासाठी अति अगम्य, अद्भूत आणि चमत्कारपूर्ण असतात.
[06:41.30] ।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।
