Lrc Player

Adhyay_39

Shreepad Shrevallabh Charitramrut
[06:43.54]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:00.16] ।। श्री गुरवे नमः ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।

[00:04.49] अध्याय - ३९

[00:05.92] नागेंद्र शास्त्रींबरोबर

[00:07.77] मी कालनाग मण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरवात केली.

[00:11.50] श्री पीठिकापुरम क्षेत्रास केंव्हा पोहचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती.

[00:15.97] कालनागाचे स्वरूप

[00:17.84] प्रवासात असतांना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले.

[00:21.55] त्या ब्राह्मणाचे नांव नागेंद्रशास्त्री असे होते.

[00:24.54] तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता.

[00:27.31] त्याच्या घरात अनेक नाग, साप निर्भयपणे फिरत होते.ते कोणाला चावत नसत.

[00:32.78] नागेंद्रशास्त्री या नाग, सर्पाना आपल्या अपत्या प्रमाणे सांभाळीत असत.

[00:37.31] ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. दिव्य नागांना मणी असतो.

[00:41.64] अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे.

[00:45.10] त्याने "काल नाग" नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा

[00:48.55] म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती.

[00:51.38] नाग मण्याचा प्रभाव

[00:53.76] नागेंद्रशास्त्री आम्हास म्हणाला "हे बंधूनो, आजचा दिवस अत्यंत शुभदिवस आहे.

[00:59.61] आपल्या सारख्या थोर व्यक्तींचे चरण कमल माझ्या या कुटित विसावले.

[01:03.59] मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपाद प्रभुंच्या दर्शनास गेलो होतो.

[01:07.84] पीठिकापुरम क्षेत्रातील कुक्कुटेश्वराचे मंदिर

[01:11.03] आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले.

[01:13.58] मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्ती जवळ एक कालनाग पाहिला.

[01:18.36] त्यांच्या फणीवर एक मणी होता.

[01:20.49] कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात.

[01:23.94] कालनागाच्या फण्यावर मणी असून

[01:26.34] तो महर्षि प्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो.

[01:29.79] मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात.

[01:33.94] साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही.

[01:36.97] कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये

[01:39.89] मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ति असते.

[01:44.66] या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात.

[01:50.51] त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना

[01:54.55] त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते.

[01:57.83] मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात.

[02:03.31] जसे घरच्या लोकांचा विरोध, बांधवांचा, मित्रांचा विरोध,

[02:07.46] ऋण, बाधा, कन्येच्या विवाहास विनाकारण विलंब,

[02:11.38] कोणत्याही कामात समर्थता असून सुद्धा यशप्राप्ति न होणे इत्यादी.

[02:16.43] स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा

[02:20.94] अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली.

[02:23.24] तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व कांही मिळाल्या सारखे होईल."

[02:27.49] श्रीपाद प्रभुंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम

[02:33.06] मी नरसिंह वर्माच्या घराजवळून जात होतो.

[02:35.99] श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते.

[02:39.87] त्या बरोबरच झाडांना पाणी घालणे सुद्धा चालू होते.

[02:43.16] श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते.

[02:46.08] त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते.

[02:48.92] त्याला चांगले पाणी मिळावे या साठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना

[02:54.47] त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या.

[02:58.03] त्या बारा वर्षाच्या मुलाच्या, सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या.

[03:03.08] तितक्यात नागेंद्रशास्त्रीची हाक कानावर आली.

[03:06.00] मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो.

[03:08.41] नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नारळाच्या जलाने धूत होते.

[03:14.14] त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पाद पद्माजवळ ठेवल्या.

[03:17.95] त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते.

[03:22.64] परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता.

[03:25.93] त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले.

[03:29.11] नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले.

[03:34.95] ते म्हणाले, "नागेंद्र शास्त्री तू "कालनागा जवळ" असलेला मणी मिळावा

[03:40.53] म्हणून फार दिवसांपासून वाट पहात होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.

[03:45.59] कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून

[03:48.77] त्याच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे.

[03:53.55] या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्याचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा.

[03:58.86] आधि-व्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील. त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे.

[04:04.17] ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरीत शांत होतील."

[04:08.96] श्रीपाद प्रभूनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले.

[04:16.02] आणि म्हणाले, "अहो नागेंद्रशास्त्री ! माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा.

[04:21.87] लोक कल्याणासाठीच नागशास्त्र विद्येचा उपयोग करा."

[04:25.32] दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ

[04:29.31] श्रीपाद प्रभू म्हणाले

[04:31.16] "हे नागेंद्रशास्त्री ! कालांतराने शंकरभट्ट, धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील.

[04:37.28] माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल.

[04:41.79] तो पर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर.

[04:46.31] शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो तसेच मनाचा, प्राणाचा एक काळ असतो.

[04:51.62] परंतु आत्मा मात्र कालातीत आहे.

[04:54.01] त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो.

[04:57.36] वृद्धि किंवा क्षय काळा प्रमाणे होत असतात.

[05:00.38] अनेक ब्रह्मांडाचा जन्म होऊन त्यांची वृद्धि होते.

[05:04.11] कांही काळ त्यांची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात

[05:08.62] हा अंत म्हणजे काल महिमाच आहे.

[05:11.54] या प्रकारचा काळस्वरूप ही माझ्या आधीन आहे.

[05:14.47] माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो.

[05:18.63] भूत-प्रेत पिशाचादि महाशक्ति सुद्धा

[05:21.45] दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाहीत.

[05:24.80] किंवा कांही वाईट करू शकत नाहीत.

[05:27.46] या सृष्टींत असलेल्या सर्व प्रांण्यापेक्षा जास्त बलवान मीच आहे.

[05:31.71] माझ्याकडून बल प्राप्ति करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात.

[05:36.23] गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो.

[05:41.00] गर्वाला, अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो.

[05:46.85] माझी आराधना करीत सर्वदा शांतीरूप होऊन राहणाऱ्यांना

[05:50.57] मी नित्यसंतुष्ट ठेवून आनंदरूप करतो."

[05:53.76] त्या महापुरुषांनी माझी वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती.

[05:58.54] श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत.

[06:00.93] दत्तात्रेयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती.

[06:04.38] कोणताही जीव भूकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे.

[06:08.90] ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत. ते सर्वभूत हितकारी होते.

[06:13.41] मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो या स्थळी मी आश्रम उभारला होता.

[06:18.73] जो कोणी माझ्या कडे येई त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे.

[06:23.50] श्रीपाद प्रभू मला म्हणाले "तुझी मंत्र शास्त्रविद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण.

[06:29.35] पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर.

[06:32.02] लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढे धन स्वीकार कर.

[06:35.47] अधिक धनाची अपेक्षा करू नकोस."

[06:38.38] ।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।