Adhyay_40
[00:02.31] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:08.16] अध्याय - ४०
[00:09.48] भास्कर शास्त्रीं, शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव
[00:13.73] आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो.
[00:16.92] कधी पायी, कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडा गाडीने
[00:21.24] असा आमचा प्रवास चालू होता.
[00:22.83] असा प्रवास करीत करीत त्रिपुरांतक क्षेत्री येऊन पोहोचलो.
[00:26.55] तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले.
[00:29.63] या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले.
[00:32.40] आमच्या जवळ श्रीपाद प्रभुंच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना
[00:37.97] श्रीचरण सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत असे.
[00:41.58] आम्ही पाऊले टाकीत असताना ती पाऊले आमची नसून
[00:44.94] श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पाऊले टाकीत असल्यासारखे वाटे.
[00:49.18] आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे.
[00:53.96] श्रीपाद प्रभूच आमच्या द्वारे बोलत असल्याचे जाणवे.
[00:57.14] आम्ही जेवण करीत असताना.
[00:59.28] ते आमच्या मुखानेच भोजन करीत असल्याचा भास होत असे.
[01:02.10] आमच्या शरीरातील मांस, रक्त नाड्यामधून
[01:05.20] श्रीप्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे.
[01:07.85] शास्त्रातील, “जीवात्माच परमात्मा आहे" हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो.
[01:12.89] परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभुंचेच चैतन्य भरून आहे
[01:17.94] याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता.
[01:22.46] या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती.
[01:27.77] श्रीत्रिपुरांतकेश्वराच्या अर्चकस्वामींचे नाव भास्करशास्त्री असे होते.
[01:32.44] त्यांना आमचा फारच अभिमान होता. ते पीठिकापुरम्ला वास्तव्यास होते.
[01:37.23] अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ति झाली होती.
[01:40.41] ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते.
[01:43.33] श्रीपीठिकापूर निवासीनी, कुक्कुटेश्वर महाप्रभूची स्वामिनी
[01:47.48] श्रीराजराजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्रदिक्षा दिली होती.
[01:51.46] आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथि म्हणून रहावे अशी आम्हास त्यांनी विनंती केली.
[01:57.04] आमच्या जवळ श्रीपाद प्रभुंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते.
[02:01.02] त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या.
[02:04.21] त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले
[02:08.09] "बाळानो तुम्ही केवढे धन्य आहात.
[02:11.12] या पादुकांची भास्करशास्त्री पूजा करीत असत.
[02:14.31] या पादुका सध्या ताम्ररूपात आहेत.
[02:16.70] भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने
[02:19.62] त्या पादुका कांही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील.
[02:23.60] हिरण्यलोकातील कांही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्यलोकात नेऊन
[02:27.85] अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका
[02:31.62] कारण लोकांत असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या.
[02:34.27] त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशिर्वाद देतो.
[02:39.31] त्यानंतर हिरण्यलोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशिर्वाद देतो.
[02:44.10] त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धि मिळते.
[02:47.82] यानंतर या पादुकांची अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन
[02:53.13] माझ्या जन्म स्थानी पीठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून
[02:57.28] जमीनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील.
[03:01.26] तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग माझी दर रोज अर्चना करतील.
[03:05.94] याच्या समवेत चौसष्ट हजार योगिनी असतील.
[03:09.39] त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील.
[03:12.85] मी तेथे ऋषी संघटने बरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून
[03:17.36] सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन.
[03:19.75] या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृष्य आणि अगोचर असलेले
[03:24.27] अजून एक स्वर्ण पीठिकापूरम आहे.
[03:26.66] हे योगदृष्टी असलेल्या भक्तानांच अनुभविता येते.
[03:30.11] माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत
[03:33.57] त्या ठिकाणीच पीठिकापुरम प्रतिष्ठापित होईल.
[03:36.75] या साठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात रहा.
[03:39.94] भविष्यात अनेक चित्र-विचित्र घटना घडणार आहेत.
[03:43.14] माझ्या महा संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्त गणांची मुंग्यासारखी रांग लागेल"
[03:48.73] ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो.
[03:52.44] अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रूपात होऊ लागला.
[03:56.42] अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळाले नाही.
[04:00.14] श्रीभास्कर शास्त्री षोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते.
[04:04.39] मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली.
[04:10.65] श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खाण
[04:13.74] ते म्हणाले, "हे बंधुनो, राजराजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन
[04:19.85] यापुढे विशाल सीमा ओलांडून पलिकडे जाणार आहे.
[04:23.57] राजराजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन
[04:27.43] मेधा शक्तित परिवर्तित होईल तसेच आपली बुद्धि विवेकपूर्ण होण्यासाठी
[04:32.57] ती महामाता आपणास सहाय्य करेल.
[04:34.86] आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मुलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल.
[04:39.79] साधारण पणे शक्ति आणि विवेक एकाच व्यक्तित एकत्रित दिसत नाहीत.
[04:44.57] परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ति आणि विवेक
[04:49.08] दोन्ही एकाच व्यक्तिमध्ये नांदतात. दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात
[04:53.66] ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते.
[04:57.21] विश्वातील विशाल भावांची वृद्धि करण्यास
[05:00.40] श्रीराजराजेश्वरीदेवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते.
[05:04.12] अत्यंत अद्भूत असे दिव्य ज्ञान मिळविण्यासाठी,
[05:07.57] शाश्वत अशी दिव्य मातृशक्ति मिळविण्यासाठी,
[05:10.76] विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी, तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे.
[05:16.08] श्रीराजराजेश्वरीदेवी अनंत अशा विवेकाची खाण आहे.
[05:19.79] तिने कांही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते.
[05:23.93] तिला अगम्य असे या विश्वात काहींच नाही.
[05:26.96] सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य,
[05:32.55] या प्रपंचातील प्रत्येक धर्म, त्याला संबंधित योग्य असा काळ,
[05:37.06] या सर्व गोष्टी राजराजेश्वरीदेवीच्या स्वाधीन असतात.
[05:40.77] तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते.
[05:44.23] तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेषभावना नसते.
[05:47.68] साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात
[05:51.40] त्याना ती विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्विकारते.
[05:55.53] ही राजराजेश्वरीची शक्ति वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने
[06:00.06] विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात.
[06:02.60] ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते.
[06:05.79] ती विश्वात कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता
[06:08.98] म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते.
[06:12.16] ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावा प्रमाणे,
[06:15.35] गरजे प्रमाणे आपला व्यवहार ठेवते.
[06:18.27] ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही.
[06:21.37] साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगति पथावर चालविते.
[06:26.68] अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गानेच जाऊ देते.
[06:30.13] त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून
[06:33.32] त्यांच्या अपराधाबद्दल त्याना क्षमा करते.
[06:36.24] ते चांगले वागोत अथवा वाईट वागोत ती त्यांच्या कडे दुर्लक्ष करते.
[06:41.03] तिची करुणा अनंत आहे. ती या संसाररूपी सागरातून तारून नेणारी आहे.
[06:46.07] तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत.
[06:51.38] राक्षस, असुर, पिशाच या सर्वानाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागविते
[06:56.70] तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो.
[07:00.95] परमात्म्याने आज्ञापिलेला मार्ग ती कोणत्याहि परिस्थितीत सोडत नाही.
[07:05.47] ती प्रयोगात आणते त्या शक्तिचे ज्ञान केंद्र ती स्वतःच असल्याने
[07:09.99] आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास "सत्यज्ञान बोध" होतो.
[07:14.78] राजराजेश्वरी देवीची शक्ति प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता,
[07:20.25] सत्यशोधन या सारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे.
[07:23.97] यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल.
[07:27.16] मी पीठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभुंच्या कृपेस पात्र झालो.
[07:32.21] तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली.
[07:38.05] आज माझा दीक्षा दिन आहे. आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस
[07:43.01] तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस.
[07:45.75] श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पीठिकापुरमहून निघून संचार करण्यास जातील,
[07:50.80] हे मी तुम्हाला उद्या सांगेन.
[07:52.55] तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा घेतला.
[07:57.60] हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्य व्हा."
[08:00.79] ।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।
