Adhyay_46
[00:03.35] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:07.92] अध्याय -४६
[00:09.63] श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षता-मध्येवाढ पादुकांची श्री भास्कर पंडिताना भेट
[00:16.26] आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिध्द झालो.
[00:20.52] भास्कर पंडित थोडया वेळ ध्यानस्थ झाले.
[00:23.70] श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितानी आपल्या देव घरात ठेवल्या होत्या.
[00:27.68] त्या पादुकावर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या.
[00:30.88] ते पाहून आम्ही आश्चर्य चकित झालो.
[00:33.80] भास्कर पंडित म्हणाले "हे श्रोत्यांनो ! श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत.
[00:39.26] श्री पद्मावती मातेचे जन्मनक्षत्र मृग आहे.
[00:42.73] आणि श्री वेंकटेश्वराचे जन्मनक्षत्र श्रवण आहे.
[00:46.28] उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्रतारा आहे
[00:50.43] तर श्री वेंकटेश स्वामीना ते परममित्र तारा असल्याने
[00:54.25] त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे.
[00:57.44] आजसुध्दा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे.
[01:00.36] या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या.
[01:05.59] यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री वेंकटेश स्वरूपच आहेत.
[01:10.71] हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली.
[01:13.63] यातील थोडया मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा . त्या तुम्हाला शुभ ठरतील
[01:18.69] आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील."
[01:22.05] शंकरभट्ट आणि धनगुप्त यांच्या बरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्राचे दर्शन
[01:27.72] आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला.
[01:31.97] ती बैलगाडी एका लग्न्राच्या वरातीची होती.
[01:35.15] या वरातीतील वैश्य प्रमुख, घोडा गाडीतून प्रवास करीत होते.
[01:39.14] ते 'कोंडविडू' गावी जात होते. ते वैश्यप्रमुख धनगुप्त म्हणाले
[01:44.10] "आज फार शुभ दिवस आहे. तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून
[01:47.82] श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या."
[01:53.12] ते पुढे सांगू लागले
[01:54.98] "मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पीठिकापुरमला गेलो होतो.
[01:58.71] तेंव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री वेंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते.
[02:03.75] त्या वेळी श्रीपाद प्रभू प्रेमभराने म्हणाले
[02:07.20] "तुझ्या पुत्राच्या विवाह समयी मी मंत्राक्षता आशिर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन.
[02:11.99] ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठविन त्या ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा दे.
[02:16.50] या नंतर आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो.
[02:19.59] तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले.
[02:23.48] या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाऱ्याशी झाली.
[02:27.29] धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले.
[02:30.75] मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका (सध्याचे विजयवाडा)
[02:34.73] या स्थळी आलो. या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून
[02:38.71] श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे.
[02:42.70] कृष्णानदी मध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले.
[02:46.15] देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले.
[02:49.34] त्यांना अनेक दिवसांपासून पीठिकापुरमला जाऊन
[02:52.49] श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती.
[02:55.87] विजयवाटिकेतून निघून आम्ही दोघे कांही दिवसांनी राजमंड्री क्षेत्री येऊन पोहोचलो.
[03:01.18] तेथे गोदावरी नदीत स्नान करून
[03:03.57] श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटी लिंगेश्वराचे दर्शन घेतले.
[03:07.56] आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता.
[03:11.81] मी माझ्याबरोबरच्या संन्याशाला म्हणालो,
[03:14.74] "थोडयाच दिवसात आपण पीठिकापुरमला पोहोचू.
[03:17.65] तेथील श्रीपाद प्रभू अवतरीत झालेले त्यांचे घर पाहू.
[03:21.37] श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊ या.
[03:25.35] श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलु यांचे आशिर्वाद घेऊ.
[03:29.34] श्रीपाद प्रभूच्या माता सुमती महाराणी,
[03:31.88] पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊ या.
[03:34.81] त्यानंतर आपण पीठिकापुरमहून कुरगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊ."
[03:39.85] संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता.
[03:42.77] मार्गातील अनेक देवालयाचे दर्शन घेत
[03:45.70] आम्ही थोडयाच दिवसात पीठिकापुरमला पोहोचलो.
[03:48.62] श्री बापनाचार्युलुच्या घरी आमची राहण्याची
[03:51.28] व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली.
[03:53.31] श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही भक्त जनांच्या मुखातून ऐकल्या.
[03:57.56] श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लीलांचे वर्णन करणे
[04:01.01] सहस्त्रमुखे असलेल्या आदि शेषाला सुध्दा कठीण आहे
[04:04.46] तेथे माझ्या सारख्या य:कश्चित ब्राह्मणाची काय कथा ?
[04:08.36] श्रीपादांच्या भक्तांचे कुरगड्डीस प्रयाण
[04:11.20] श्री नरसिंहवर्माच्या धर्म पत्नीने कुरगड्डीस जाऊन
[04:14.91] श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला.
[04:17.83] याच संदर्भात त्यानी श्री वेंकटप्पा श्रेष्ठी
[04:20.75] आणि बापनाचार्युलु बरोबर चर्चा केली.
[04:23.33] सर्वानी मिळून एक मताने कुरगड्डीस जाण्याचा निश्चय केला.
[04:27.31] श्रीपादांचे माता-पिता, सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा
[04:31.29] आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते.
[04:35.55] या सर्व मंडळींनी अठरा घोडागाडया ठरविल्या ,
[04:38.73] त्यात बसून सामानासह एका शुभ दिनी प्रात:काळीच सर्वांनी प्रयाण केले.
[04:43.77] पिठापुरम् ते कुरगड्डी अंतर बरेच असल्याने
[04:47.13] प्रवासास कित्येक दिवस लागणार होते.
[04:49.88] सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केंव्हा पाहीन असे झाले होते.
[04:54.30] त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळयात पाणी तरळले.
[04:57.76] सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना,
[05:01.74] असे सांगून तिचे समाधान केले. प्रवास चालूच होता.
[05:06.27] आईवडील, आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुन:दर्शन
[05:10.69] सर्वांतर्यामी आणि मायानाटकसुत्रधारी असलेले
[05:14.40] त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पीठिकापुरमहून येणारी मंडळी
[05:19.15] घोडा गाडीसह दिसत होती.
[05:21.13] प्रात:काळी निघालेल्या गाडया दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या.
[05:25.81] अचानक एक अद्भूत घटना घडली.
[05:28.28] गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्च्छा आल्या सारखे वाटले.
[05:32.51] त्या सर्वांना आपल्या गाडया आकाश मार्गाने जात असल्यासारखा भास झाला.
[05:37.02] थोडया वेळाने मर्च्छा गेल्यावर आम्ही पाहिले
[05:39.42] तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले.
[05:42.34] गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो.
[05:46.32] रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले.
[05:50.49] तो म्हणाला, "महाराज, हे पंचदेव पहाड गांव आहे.
[05:54.10] आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो.
[05:58.34] त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेम कुशल विचारून
[06:03.28] त्याच्या आधिव्याधी दूर केल्या.
[06:05.51] दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती."
[06:09.76] असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला.
[06:13.48] आम्ही प्रात:काळी पिठापुरमहून घोडागाडीने निघालो होतो.
[06:17.47] आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढया थोडया वेळात
[06:21.36] येथे कसे येऊन पोहोचलो याचे महदाश्चर्य वाटत होते.
[06:24.90] आम्ही नावेतून नदी पार करून कुरगड्डी गावात प्रवेश केला.
[06:28.89] हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता.
[06:33.14] परंतु ही वस्तुस्थिती होती. आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो.
[06:37.92] सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्यभावाने आपल्या हृदयाशी धरले.
[06:42.70] तिच्या नयनांतून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते.
[06:47.74] श्रीपाद म्हणाले
[06:49.34] "आई तू निर्गुण निराकार असलेला परतत्वाच्या मुलाची माता आहेस.
[06:54.12] तू अनसूया माते प्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस."
[06:57.84] असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रु पुसले.
[07:01.73] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
