Lrc Player

Adhyay_49

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[07:37.52]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.29] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:07.88] अध्याय -४९

[00:09.83] श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान

[00:13.28] तेहतीस (33) संख्या विशेष - कुरुगड्डीतील श्रीपादाचे कार्यक्रम

[00:18.07] श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले

[00:20.19] "शंकरभट्टा ! आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्नि विद्या आहे.

[00:24.52] अग्नि उपासना करणे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे

[00:29.12] विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे."

[00:31.93] यावर मी श्री प्रभूंचा जयजयकार करून म्हणालो,

[00:35.30] "महाराज माझ्या जीवनानंतर सुध्दा ही शेगडी अशीच राहणार आहे."

[00:39.73] यावर श्रीपाद प्रभू म्हणाले "तुझ्या विझलेल्या शेगडीत स्वत:ची शक्ति नाही.

[00:45.11] माझ्या योगशक्तिने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन

[00:49.17] भक्तांची दैन्य, दु:ख हरण करीत आहे.

[00:52.27] ही शेगडी अजून नऊ वर्षे पर्यंत पेटणार आहे.

[00:55.10] म्हणून मी तेहतीस (33) वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो.

[00:58.46] त्यानंतर तीन वर्षे पर्यंत तेज स्वरूपात राहून

[01:01.57] श्रध्दाळू भत्तचनांच दर्शन देत होतो.

[01:04.13] तेंव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो.

[01:06.71] योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात.

[01:10.61] रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे." श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले,

[01:15.82] "आपला अग्नियज्ञ यानंतर सुध्दा चालूच राहील.

[01:19.17] कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतिक म्हणून

[01:22.97] अग्नि आराधना करायची असते.

[01:25.00] यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते,

[01:29.41] त्या पूर्वी कारणरूप देह हा कारण शरीरात असतो.

[01:33.39] यामुळे तेहतीस वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते.

[01:38.70] त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्याची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून

[01:43.22] आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात.

[01:47.74] माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून

[01:50.40] आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षे पर्यंत चालेल.

[01:54.38] त्यानंतर या स्थूल रूपात अग्नीपूजा करण्याची आवश्यकता नाही.

[01:58.63] पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे.

[02:03.41] तसेच जलयज्ञ सुध्दा मी सुरु केला आहे.

[02:05.96] तो सुध्दा मोठ्या थाटात साजरा होत आहे.

[02:08.89] आता अग्निपूजा आणि अग्नि यज्ञाची सुरवात करायची आहे.

[02:12.87] तो यज्ञ सुध्दा अप्रतिम होईल यात शंकाच नाही.

[02:16.06] समस्त जीव राशीतील अग्निस्वरूप माझेच आहे.

[02:19.52] सर्वांचे शुध्दिकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुध्दा मीच आहे.

[02:24.56] पंचतत्वा संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही.

[02:29.08] एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते.

[02:33.59] त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली.

[02:37.84] त्या आदेशानुसार ती दोघे पती, पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली.

[02:42.89] परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला.

[02:46.34] या अकस्मात मृत्युने ती नववधु अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली

[02:51.38] "प्रभु आपल्या भक्तांचे रक्षण करतात

[02:54.05] आणि त्यांची कृपा दृष्टी सर्वावर असते असे ऐकले होते.

[02:57.76] परंतु आज तर हे अघटितच घडले" ती दु:खाने रडू लागली.

[03:02.01] त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले.

[03:06.00] त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वाना पडला.

[03:11.04] श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही

[03:15.83] असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले.

[03:18.75] तेवढयात श्रीपाद प्रभू दरबारात आले.

[03:21.14] शोक सागरात बुडालेल्या त्या नववधूने

[03:23.43] श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली.

[03:27.41] श्रीपाद प्रभू म्हणाले "कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते"

[03:31.92] यावर ती नववधू मोठ्या श्रध्दायुक्त भावाने म्हणाली

[03:35.65] "प्रभो ! या विश्वात आपणास अशक्य असे काहींच नाही.

[03:39.89] माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दु:खातून सोडवा"

[03:43.34] त्या नववधूला श्रीपाद प्रभूच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता.

[03:48.66] मृतजीवास जीवनदान

[03:51.05] श्रीपाद प्रभु म्हणाले "तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल .

[03:55.30] माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रध्दा भावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल.

[03:59.82] कर्म सिध्दांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो.

[04:03.53] तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणुन

[04:07.78] त्या लाकडांवर स्वयंपाक कर.

[04:09.55] चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल."

[04:13.80] श्रीपादांच्या सांगण्या प्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच

[04:16.89] तो तरूण झोपेतून उठल्या प्रमाणे उठून उभा राहीला.

[04:20.09] आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून

[04:22.22] त्या नववधूच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

[04:25.04] सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जयजयकार केला.

[04:29.28] दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा

[04:33.53] एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला.

[04:37.79] तो परिस्थितीने एवढा गांजला होता की,

[04:40.71] श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता.

[04:45.76] श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला.

[04:48.41] त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून

[04:50.45] त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला.

[04:53.11] त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली

[04:56.03] व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले

[04:59.48] "अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास.

[05:03.73] मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस.

[05:07.71] त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने

[05:11.17] या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली.

[05:14.09] आता तुला दारिद्रयापासून मुक्तता मिळेल."

[05:16.75] असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन

[05:21.26] पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले.

[05:25.25] प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले.

[05:29.76] घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहीले तो काय आश्चर्य

[05:33.74] ते लाकूड सोन्याचे झाले होते.

[05:35.88] अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती.

[05:40.65] श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नि यज्ञाने दहन केले होते.

[05:45.43] कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी भोपळा

[05:48.89] अशा फळभाज्या आणण्यास सांगत.

[05:51.01] त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत.

[05:55.52] अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत.

[05:59.78] यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत.

[06:02.70] एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली.

[06:06.42] तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला कुज दोष (मंगळ दोष) असल्याने

[06:11.47] प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला.

[06:14.39] त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले.

[06:18.90] त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन

[06:22.89] तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला.

[06:25.21] श्रीपाद प्रभू कांही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत.

[06:29.98] तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत.

[06:34.24] घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास

[06:36.89] किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास

[06:40.26] त्याना श्रीपाद प्रभु दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी

[06:43.98] (सकाळी 10-30 ते 12-00) अंबिकेची पूजा करण्यास सांगत.

[06:48.76] श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला.

[06:51.95] त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लाऊन

[06:56.46] तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले.

[06:59.12] तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको

[07:01.78] असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला.

[07:07.09] एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी

[07:12.14] गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले.

[07:16.65] असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला.

[07:20.90] अशा किती तरी नवीन नवीन पध्दतीद्वारा

[07:23.82] श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मा पासून मुक्तता केली.

[07:27.81] या सर्व पध्दती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे.

[07:32.58] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥