Lrc Player

Adhyay_50

Shreepad Shreevaallabh Charitramrut
[03:23.70]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.37] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:08.05] अध्याय -५१

[00:09.91] जलोदरा पासून रक्षण-ग्रंथ पारायण महिमा

[00:13.63] मी कुरवपुरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली.

[00:16.99] त्या दिवशी हस्त नक्षत्र होते.

[00:19.38] कृष्णानदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले.

[00:23.62] ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले.

[00:27.88] त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो.

[00:31.59] तेंव्हा प्रभू म्हणाले "अरे शंकरभट्टा !

[00:35.31] मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे

[00:37.97] मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरवपुरात गुप्त रूपाने संचार करीन

[00:42.75] नंतर नृसिंहसरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उध्दारासाठी अवतार घेईन.

[00:48.32] तू लिहीत असलेला "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ," महापवित्र ग्रंथ

[00:53.38] भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो 'अक्षर सत्य' ग्रंथ असेल."

[00:58.68] "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा"

[01:02.67] या माझ्या नांवाचा जयघोष सर्वत्र होईल.

[01:05.66] या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल.

[01:09.37] इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल.

[01:12.56] या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल.

[01:16.80] तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ

[01:19.19] माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील.

[01:24.66] तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील.

[01:29.70] हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल

[01:32.88] त्यांना माझे दर्शन अवश्य होईल.

[01:35.28] मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो.

[01:39.26] तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद केला जाईल

[01:43.24] तो बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल.

[01:48.03] या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील.

[01:51.48] या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता

[01:54.93] दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन

[02:00.16] त्याचे सकल व्याधिपासून रक्षण होईल.

[02:03.08] भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभय वचन

[02:06.26] श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले

[02:09.19] "तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन

[02:13.44] मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस.

[02:17.15] मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे.

[02:20.61] मी नाही म्हणून तू दु:खी होऊ नकोस.

[02:23.27] तू तीन वर्षे येथेच रहा.

[02:25.39] या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन.

[02:29.38] तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन."

[02:33.10] श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान

[02:35.48] "हे शंकरभट्टा ! तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस

[02:40.26] तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव .

[02:45.84] त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील.

[02:49.29] सर्वाना माझे मंगलमय आशिर्वाद.

[02:51.95] श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले.

[02:57.53] त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून,

[03:00.98] आई पासून दुरावलेल्या निरागस बालका सारखा स्फुंदुन स्फुंदुन रडू लागलो.

[03:06.03] श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय

[03:08.42] ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले

[03:11.61] आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो.

[03:14.00] तेंव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले.

[03:18.78] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥