Adhyay_53
[00:03.07] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:07.93] अध्याय -५३
[00:09.63] श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचे
[00:12.55] पीठिकापुरम पोहोचण्याचे विधान - ग्रंथाचे वैशिष्टय
[00:16.71] मी लिहिलेला "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत" ग्रंथ थोडे दिवस
[00:20.88] श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता.
[00:23.54] त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला.
[00:28.06] तेलुगु भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला.
[00:32.73] गंधर्वानी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला .
[00:38.67] त्याचे सिध्दयोग द्वारा पठन होत आहे.
[00:41.33] मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकाजवळ ठेऊन
[00:45.85] मी त्यांना वाचून दाखविले.
[00:47.60] ऐकण्यास आलेले पांच भक्त ते श्रवण करून धन्य झाले.
[00:51.32] मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल
[00:55.57] ते सांगु शकत नाही. श्री बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात
[01:00.62] या ग्रंथाची तेलुगु भाषेतील प्रत उदयास येईल.
[01:04.07] ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला
[01:07.52] त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन
[01:10.45] तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून
[01:13.64] हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा.
[01:16.82] या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास
[01:21.87] गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल.
[01:25.06] तो प्रसाद आणून देणारी व्यक्ति
[01:27.18] बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढितील असेल.
[01:30.10] हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे.
[01:34.62] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
