Lrc Player

G

H
[04:15.32]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:15.44] देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा

[00:22.10] देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा उघड दार देवा आता,

[00:35.65] उघड दार देवा ॥टेर॥

[00:49.73] पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची

[00:56.10] मनी चोरट्याच्या का रे, भीती चांदण्याची

[01:04.87] सरावल्या हातांनाही, कंप का सुटावा... उघड दार देवा आता ॥1॥

[01:18.45] 🎶Shraddha🎶

[01:25.63] उजेडात होते पुण्य, अंधारात पाप

[01:31.99] ज्याचे त्याचे हाती आहे, कर्तव्याचे माप

[01:40.77] दृष्ट दुर्जनांची कैसी, घडे लोकसेवा... उघड दार देवा आता ॥2॥

[02:02.27] स्वार्थ जणु भिंतीवरचा, आरसा बिलोरी

[02:08.38] आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी

[02:17.15] घडोघडी अपराधाचा, तोल सावरावा... उघड दार देवा आता ॥3॥

[02:38.14] तुझ्या हाती पांडुरंगा, तिजोरी फुटावी

[02:44.51] मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी

[02:53.28] मार्ग तुझ्या राऊळीचा, तो मला कळावा

[03:00.18] .. उघड दार देवा आता ।।4।।

[03:17.19] भलेपणासाठी कोणी, बुरेपणा केला

[03:22.76] बंधनात असुनी वेढा, जगी मुक्त झाला

[03:31.82] आपुल्याच सौख्यालागी, करील तो हेवा

[03:38.47] ... उघड दार देवा आता ।।5।।