Lrc Player

Adhyay_26

Shreepad Shreevallabh Charitramrut
[06:01.18]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.46] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.09] अध्याय -२६

[00:11.48] कलीयुगाचे लक्षण

[00:13.06] आम्ही प्रात:काळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो.

[00:19.44] धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती.

[00:27.14] आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते.

[00:30.06] त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृत दृष्टी

[00:33.79] साऱ्या साधकांना एका अगळया वेगळया अध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती.

[00:39.09] प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो.

[00:43.36] श्री धर्मगुप्तांनी, श्रीपादांना, कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष

[00:48.18] वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली.

[00:51.09] श्रीपाद प्रभू म्हणाले ''साधकानों, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे.

[00:58.26] सूर्याला कालात्मक असे सुध्दा म्हणतात.

[01:01.45] धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा

[01:07.03] परत फिरुन धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात.

[01:12.61] ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टीकल्प असे म्हणतात.

[01:17.12] आणि उरलेल्या भागास प्रलय कल्प असे म्हणतात.

[01:20.31] पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धाभाग शुक्लपक्ष

[01:25.66] आणि अर्धाभाग कृष्णपक्ष असे असतात.

[01:28.58] संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण

[01:32.30] आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात.

[01:36.01] संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात.

[01:40.80] या रहस्य विद्येला तारक राजविद्या असे म्हणतात.

[01:44.78] तारक राजयोगात शरिरालाच ब्रह्मांड मानतात.

[01:48.50] समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात.

[01:55.14] या शिरस्थानात आचार विचार असतात.

[01:58.06] नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो.

[02:03.11] पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्युदेवता स्वरूपात वास करतात.

[02:07.62] या जन्युदेवतांचे कार्य असे की मानवाच्या गत जन्मात केलेल्या कर्माचे फळ

[02:13.47] पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ

[02:17.98] एका क्रमपध्दतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते.''

[02:22.27] कलियुगाचे लक्षण

[02:24.92] पितृदेवता म्हणजे आपले दिगंवत झालेले पूर्वज नव्हे.

[02:28.91] स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता-पिता, आजी आजोबा

[02:32.63] यांच्या नांवाने आपण केलेल्या श्राध्दपक्षाचे फळ स्विकारून

[02:36.59] त्याना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्युदेवताच असतात.

[02:41.11] या जन्यु देवतांना जन्म नसतो.

[02:43.76] योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतुंचे दर्शन करतात.

[02:48.28] एका वर्षात बारा पौर्णीमा आणि बारा अमावास्या असतात.

[02:52.80] हे चोवीस पर्वच गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात.

[02:57.32] कालस्वरूपी श्री विष्णु भगवानांना कांही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात.

[03:03.69] या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात.

[03:07.41] प्रत्येक महिन्याचे एक अक्षर या प्रमाणे

[03:11.10] बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो.

[03:15.38] नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य, पशु, संपत्ती यांची अपार हानी होणे,

[03:22.02] भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे, सूर्य, चंद्राची गती बदलणे,

[03:28.17] दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात ''धूमकेतू'' तारा दिसणे

[03:33.48] ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत.

[03:36.13] द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर

[03:41.23] कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती.

[03:46.00] हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात.

[03:50.25] म्लेंछ जातीचा आविर्भाव

[03:53.17] जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार,

[03:56.36] यज्ञ यागादी तपस्या याचाच जोर सर्वत्र चालू होता.

[04:00.08] या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दु:ख झाले.

[04:03.81] त्याने भगवंताची प्रार्थना केली ''हे प्रभो, पृथ्वीवर सगळी कडे

[04:09.64] यज्ञ, याग, धार्मिक आचरण, नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे.

[04:14.43] अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू.

[04:18.72] आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे

[04:23.24] परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत आहे.''

[04:27.24] कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत्प्रभूंनी कलियुगास

[04:31.75] पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले.

[04:34.45] म्लेंछ जातीचा मूलपुरुष आदम आणि स्त्री हव्यावती

[04:38.96] या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले

[04:42.71] त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले.

[04:48.02] वास्तविक पहाता ते स्त्री पुरुष भाऊ-बहीण होते.

[04:51.75] परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून

[04:55.73] त्यांच्यात काम भावनेचे बीज पेरले.

[04:58.65] आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरीत केले.

[05:02.37] ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर

[05:05.29] त्यांच्यातील दिव्य शक्ति अदृष्य झाली.

[05:07.95] कालांतराने या जोडीपासून कलिधर्मांच्या मूळ म्लेंछ जातीचा अविर्भाव झाला.

[05:13.53] द्वापारयुगाच्या अंति म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर

[05:18.57] म्लेंछ देशात म्लेंछ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे

[05:23.09] भविष्य पुराणातील प्रत्येक सर्गपर्वात कथन केले आहे.

[05:27.08] नीलांचल पर्वता जवळ आदम आणि हव्यावती

[05:31.32] या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी,

[05:36.67] अभक्ष्य भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली.

[05:41.71] श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''मी कल्कि अवतार घेऊन

[05:45.96] कोटयावधि अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून

[05:49.68] पुनरपि सत्य युगाची स्थापना करणार आहे.

[05:53.13] हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे.''

[05:56.85] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥