Adhyay_27
[00:02.43] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:09.07] अध्याय -२७
[00:11.19] पंचदेव पहाड प्रांतात विरुपाक्षाची भेट
[00:14.91] श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलिकडील तिरावर पोहोचलो,
[00:19.96] ती मध्यान्हीची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता.
[00:24.24] गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारीत.
[00:28.49] असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्ह वेला होती.
[00:33.30] पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी
[00:37.29] असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता.
[00:39.94] ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुध्दा ते म्हणाले होते.
[00:44.19] परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता.
[00:49.24] कुटी बांधण्यास सोयिस्कर जागा हवी होती.
[00:51.90] बांधकामाचे साहित्य गवत, काठ्या दोऱ्या, पाने
[00:56.41] इत्यादि काहीच वस्तु आमच्या कडे नव्हत्या.
[00:59.07] कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुध्दा तेथे नव्हते.
[01:02.79] पंचदेव पहाड स्थानाचे महत्व
[01:06.50] कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता.
[01:09.69] या परिसरात आम्ही वाटसरु प्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो.
[01:13.68] फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो.
[01:16.86] तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता.
[01:21.12] शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता
[01:25.10] आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरिता घालून ठेवली होती.
[01:29.92] त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले.
[01:34.70] आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेजलेलेच होतो.
[01:38.15] शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही
[01:41.34] ही शंका आमच्या मनांत क्षणभर डोकावून गेली.
[01:44.53] तेंव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला,
[01:47.45] आमची जनावरे चोरुन नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला
[01:51.68] शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का ?
[01:56.20] त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो.
[01:59.42] परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले.
[02:02.34] त्या शेताच्या मालकाचे नांव विरुपाक्ष असे होते.
[02:05.79] भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका-एका झाडास बांधण्यात आले.
[02:09.78] मी एक गरीब ब्राह्मण आहे. माधुकरी मागून आपला उदर निर्वाह करतो
[02:14.82] असे अत्यंत दीनवाणीने त्यांना सांगितले.
[02:18.01] माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुध्दा पुन्हा सांगितले.
[02:21.73] या नंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल
[02:26.78] अशा विचाराने त्यांच्या कडे गेले
[02:29.17] आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकाऊन ध्यावे अशा विचारात होते.
[02:34.23] श्रीपाद प्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला
[02:39.02] आमची सत्यस्थिती परोपरीने समजाऊन सांगितली,
[02:43.00] तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही.
[02:46.72] त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे ते सुचत नव्हते.
[02:51.76] त्याच वेळी एक यात्रेकरूंचा घोळका (तांडा) तेथे आला.
[02:56.01] या यात्रेकरूंमध्ये ''शिवकावडी'' नावाचा एक भक्त समुदायात होता.
[03:00.79] हे यात्रेकरू वासविकन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात.
[03:05.31] हे भक्तगण त्रिपुंडगंध लावतात. घंटानाद करीत,
[03:10.09] श्री कन्यका परमेश्वरीची स्तुतीभरित गीते गात आपले मार्गक्रमण करतात.
[03:15.94] गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी
[03:19.66] किंवा वासवि मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात.
[03:24.96] या यात्रेकरूमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात.
[03:28.68] त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो.
[03:31.61] या पट्टयामध्ये तलवार, कवच, आणि विविध प्रकारची युध्दाची शस्त्रे असतात.
[03:37.22] या लोकांच्या समुदायास ''वीरमुष्टि'' असे नांव आहे.
[03:40.93] हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात.
[03:45.45] त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना
[03:48.11] आणि वीरमुष्टि लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला.
[03:52.37] त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा
[03:57.95] असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला. आम्ही कामास लागलो.
[04:02.73] सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षाने आम्हास प्रश्न केला,
[04:06.46] ''मुष्ठीतील मुष्ठी वीरमुष्ठी याचा अर्थ काय ?''
[04:10.19] आम्हास तो अर्थ माहित नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले.
[04:15.23] त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुध्दा त्याने आम्हास दिले.
[04:19.49] गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तेथेच झोपावे
[04:23.47] असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले
[04:25.86] नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्या बरोबर हसत खेळत निघून गेला.
[04:30.93] त्या रात्री आम्ही मध्यरात्री पर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण
[04:35.46] आणि दिव्य लीलांचे स्मरण करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली
[04:40.23] सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो.
[04:43.95] आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या.
[04:46.87] आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले
[04:49.81] की ती जागा त्यांनी किती किंमतीस विकत घेतली.
[04:52.73] आम्ही काल घडलेला वृतांत त्याना संपूर्णपणे सांगितला,
[04:56.99] परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेडयातच काढले.
[05:00.44] आमच्या मनांत एकच प्रश्न सतत घोळत होता
[05:03.36] काल पाहिलेले दृष्य खरे का हे दिसत असलेले खरे.
[05:07.61] अशा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित गृहस्थ आला.
[05:12.39] त्याने आम्हास विचारले ''श्री वासविकन्यका देवीचा जन्म
[05:17.17] वैशाख शुध्द दशामीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला ?''
[05:21.68] या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले,
[05:25.94] ''श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुध्द दशमीच्या दिवशी
[05:29.93] मध्यान्ह समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता.''
[05:34.18] हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, ''तुम्ही दोघे वेडे आहात.''
[05:39.50] त्या गृहस्थाने श्रीपाद प्रभू बद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत.
[05:44.54] परंतु कुरुगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो.
[05:50.39] आमच्या दोघांकडे नावडयास देण्यास पैसे नव्हते
[05:53.58] ही गोष्ट आम्ही नावाडयास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली,
[05:57.03] त्यामुळे नावाडयाला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले.
[06:01.54] नाव चालू झाल्यावर नावाडयाची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली.
[06:07.39] त्याने ती काढून घेतली परंतु स्वत:जवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली.
[06:14.03] आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोहोचलो
[06:17.22] त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते.
[06:23.86] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
