Lrc Player

Adhyay_29

Shreepad Shreevallabh Charitramrut
[02:04.41]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.23] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.10] अध्याय -२९

[00:10.96] श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश

[00:14.42] आम्ही कुरुगड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो.

[00:21.06] तेंव्हा प्रभू म्हणाले

[00:23.71] ''अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो.

[00:29.57] हे श्रोतेहो हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे.

[00:34.36] कोठेही होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या

[00:38.33] आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो.

[00:41.80] मी देश कालाचा शास्ताच आहे.

[00:44.74] तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच

[00:48.17] तुम्हाला माझ्या बद्दलचे ज्ञान होईल.

[00:50.56] सर्व धर्मांचा परित्याग करून,

[00:53.51] तुमच्या अंतरंगातील अंतर्यामीरूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास,

[00:59.12] माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास

[01:02.32] मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवन्मुक्त करीन.

[01:07.10] केवळ माझ्या शब्दानेंच मी सृष्टीमध्ये शासन करतो

[01:11.09] यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिध्दी पावेन.

[01:15.11] कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपु सारखाच असेल.

[01:19.13] त्यांच्या समस्या, भाव आणि आचार-विचार

[01:22.61] या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील.

[01:26.59] त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून

[01:31.08] हिरण्यकश्यपूसारखे वरदान सुध्दा सृष्टी मातेकडून मिळेल.

[01:35.33] परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप, निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ

[01:40.91] नरसिंहाचा अवातर घ्यावा लागेल. यासाठी मी ''नृसिंह सरस्वती''

[01:46.22] या नाम रूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिध्द होईन.''

[01:52.06] एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले

[01:55.52] आणि त्यांनी आम्हास सुध्दा ध्यानात बसण्यास सांगितले.

[01:59.50] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥