Lrc Player

Adhyay _30

Shreepad Shreevallabh Charitramrut
[02:50.07]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.74] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.59] अध्याय -३०

[00:11.19] श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान

[00:13.85] निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीच सांगितले

[00:17.62] नाथ संप्रदायाप्रमाणे, जीव, चौसष्ट शाबर तंत्राचा उपयोग करून

[00:22.92] परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उध्दार करून घेतो.

[00:27.71] नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत.

[00:31.96] आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत.

[00:37.27] बुध्दीबळाच्या पटावर चौंसष्ट घरे असतात.

[00:40.99] श्रीमहाविष्णु श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठलोकांत बुध्दिबळाचा डाव खेळतात

[00:46.83] याचा गुढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या

[00:51.08] निरनिराळया जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ

[00:54.28] आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत,

[00:58.00] त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात.

[01:03.60] दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता

[01:07.58] मानवाच्या अध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारीत असतो.

[01:13.18] प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते.

[01:16.90] या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योगपध्दति,

[01:20.87] मंत्रजप, यज्ञयागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे

[01:26.20] इत्यादी पध्दतीचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी.

[01:31.49] या प्रकाशावर नाडीशुध्दि अवलंबून असते.

[01:35.22] नाडीशुध्दीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळया शारिरीक,

[01:39.99] मानसीक, अध्यात्मिक शक्तीची प्राप्ति होते.

[01:43.44] त्या त्या शक्तींचा विकास झाला

[01:45.84] म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो.

[01:52.23] श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले

[01:54.62] ''शंकरभट्टा, भविष्यात माझे महासंस्थान

[01:58.59] श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल.

[02:02.30] श्रीपीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार

[02:07.12] हे तिन्ही मिळून एक महानगर होईल.

[02:10.08] माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल.

[02:15.93] कलियुगात अनेक आश्चर्ये घडतील.

[02:18.85] वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक

[02:22.85] श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पूजारी नेमला जाईल.

[02:26.61] त्याच्या बरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही.

[02:31.39] क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील.''

[02:36.17] असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले.

[02:40.15] ते पहाण्यास सहस्त्रावधि जन्म सुध्दा अपुरेच पडतील.

[02:44.14] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥