Adhyay_32
[00:03.55] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:09.39] अध्याय -३२
[00:11.54] नवनाथांचे वर्णन
[00:13.67] नवनाथांचा वृतांत
[00:15.83] श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला
[00:22.23] ''महाप्रभू ! नवनाथ या नांवाने प्रसिध्द असलेले सिध्द योगी
[00:27.34] सर्व श्रीदत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते.
[00:32.16] त्यांच्या विषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना.''
[00:38.81] श्री नवनाथांचे नांव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून
[00:43.88] अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्या सारखे वाटले.
[00:49.46] त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होते.
[00:53.44] ते अत्यंत आनंदाने म्हणाले
[00:56.37] ''श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग,
[01:03.84] भर्तरि, चर्पट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत.
[01:08.69] त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफल सिध्द होते.
[01:12.67] श्रीदत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते.
[01:17.72] कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उध्दवासारख्या महान भक्ता बरोबर
[01:23.03] तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून,
[01:26.50] आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले.''
[01:31.28] ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते.
[01:34.73] त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात.
[01:40.31] त्यांची नांवे 1) कवि 2) हरी 3) अंतरिक्ष 4) प्रबुध्द 5) पिप्पलायन
[01:46.96] 6) अविर्होत्र 7) दुमिल 8) चमस 9) करभाजन अशी होती.
[01:52.81] हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिध्दपुरुष होते.
[01:57.06] माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म संस्थापनार्थ
[02:02.12] नवनाथ या नाम रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला.
[02:06.91] प्रथम पुत्र कवि हा ''मच्छेंद्रनाथ'' या नांवाने जन्मला.
[02:11.72] अंतरिक्ष ''जालंदर'' नांवाने जन्मला.
[02:14.91] यांच्या शिष्य रूपाने प्रबुध्द ''कनिफा'' या नावाने जन्मला,
[02:19.47] पिप्पलायन ''चर्पटनाथ'' या नांवाने जन्मला.
[02:22.92] अवर्होत्र हा ''नागेश नाथ'' या नांवाने जन्मला.
[02:26.90] दृमिल हा ''भर्तरिनाथ'' या नांवाने जन्मला.
[02:30.62] चमस, ''रेवणनाथ'' रूपाने आणि कारभाजन ''गहनीनाथ'' या नांवाने जन्मला.
[02:36.46] सृष्टीवर अनेक स्थानी कांही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले.
[02:42.07] त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील
[02:44.99] असे व्यास महर्षिंनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते.
[02:49.00] उपरिचर नावाचा एक वसु होता.
[02:51.66] त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला.
[02:56.18] त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले.
[03:00.16] ते एका मासोळीने गिळले.
[03:02.55] ह्या मत्स्या पासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला.
[03:06.27] कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले.
[03:12.15] त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता.
[03:16.40] बृहद्रथाने जेंव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंदर नाथांचा अविर्भाव झाला.
[03:22.59] रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी.
[03:26.05] या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिध्दांचा जन्म झाला.
[03:31.89] एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले
[03:36.14] ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले.
[03:39.07] त्या योगाने ती नागीण गर्भवती झाली.
[03:42.29] त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग, सर्पाना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता.
[03:49.20] ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारा बरोबर शेकडो सर्प नाग यज्ञ कुंडात येऊन पडू लागले.
[03:55.62] या महा भयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी
[03:59.60] तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपविले गेले.
[04:04.65] त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्याने
[04:08.37] त्या अंडयास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली.
[04:13.71] यथासमयी त्या अंडयातून वटसिध्द नागनाथाचा जन्म झाला.
[04:17.96] मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता.
[04:23.81] त्यांच्या दर्शनसाठी अनेक लोक येत असत.
[04:26.99] एक वांझ स्त्रीने मच्छेंद्रनाथाना नमस्कार केला
[04:30.45] व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले.
[04:34.96] परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरडयावर फेकून दिले.
[04:39.48] त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला.
[04:45.32] पार्वतीच्या विवाह समयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव
[04:49.89] तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला.
[04:55.77] या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली
[04:58.98] आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले.
[05:02.16] त्या क्षणीच त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले
[05:05.62] आणि त्यातून वालखिल्य या नांवाचे साठ हजार ऋषी जन्मास आले.
[05:09.87] त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागिरथी नदीत फेकला गेला.
[05:15.48] तो कचरा, नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला.
[05:19.21] त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चर्पटनाथाचा जन्म झाला.
[05:24.29] कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना
[05:28.01] आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले .
[05:31.19] त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षिंना कळाले.
[05:36.24] त्यांनी ते पात्र तेथेच संभाळून ठेवले
[05:39.43] ''भर्तरि'' या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो.
[05:42.67] त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला
[05:46.13] यामुळे त्यांचे नांव भर्तरिनाथ असे पडले.
[05:49.32] हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता.
[05:54.91] एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले
[05:58.09] आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले.
[06:01.32] ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले.
[06:03.72] त्या कानातूनच प्रबुध्दाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला.
[06:08.23] कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नांव कर्ण कनिफा असे पडले.
[06:13.28] गोरक्षकाने संजिवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली.
[06:19.12] त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजिवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले
[06:24.43] आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवातर धारण केला.
[06:28.68] श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणानी आपले स्थूल शरीर
[06:32.72] मंदपर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले
[06:36.23] आणि अंशअवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला.
[06:41.01] धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता.
[06:47.12] श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून
[06:52.43] आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो.
[06:55.09] आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जयजयकार केला.
[06:59.08] यानंतर मी प्रश्न केला
[07:01.46] ''प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशअवतार आहेत
[07:06.51] असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण
[07:09.98] यामध्ये कांही फरक आहे काय ?'' आमच्याकडे आपल्या दिव्य, प्रेमळ दृष्टीने पहात
[07:15.61] श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले आणि म्हणाले
[07:19.65] ''श्रोत्यानो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे.
[07:24.95] देविदेवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुध्दा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात.
[07:31.33] या अंशमात्र संकल्पांना थोडे फार स्वातंत्र्य असते.
[07:35.05] हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस
[07:38.81] चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे.
[07:42.59] तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते.
[07:47.90] संकल्प मात्र मूळ तत्त्वातूनच येतात.
[07:50.82] त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतरातले कार्य असते.
[07:56.14] कोणतीही समस्या निर्माण झाल्यास
[07:58.80] अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्त्वाकडे निवेदन घेऊन येतात.
[08:03.85] मूलतत्त्वाकडून अनुमति घेऊन जीवांचे कल्याण करतात.
[08:07.84] या अंशावतारात, राग, लोभ, मद-मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात.
[08:14.75] यामुळे मूलतत्त्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुध्दा आढळते.
[08:19.79] या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात कांही फरक नसतो.''
[08:25.39] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
