Lrc Player

Adhyay_37

Shreepad Shreevallabh Charitramrut
[07:38.83]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.46] ।। श्री गुरवे नमः ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।

[00:09.59] अध्याय - ३७

[00:11.45] छिन्नमस्तादेवीचे वर्णन

[00:14.11] बंगारय्या व बंगारम्मा यांचा निरोप घेऊन,

[00:17.56] त्यांनी दिलेल्या चर्मपादुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला.

[00:22.07] आम्ही एका अरण्यातून चाललो होतो.

[00:24.47] जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो.

[00:28.47] तेवढ्यातच काही योगिनीगणांचा घोळका तेथे आला.

[00:32.19] त्यांनी आम्हाला पाहून म्हटले, "आता सायं संध्येची वेळ आहे.

[00:36.97] यावेळी आपण या प्रातांत येऊच नये.

[00:39.88] येथे आम्ही छिन्नमस्तादेवीची पूजा करणार आहोत. ही फार रहस्यमय देवता आहे.

[00:46.00] येथे पुरुषांना प्रवेश नाही. एवढेच नव्हे तर ही दैवभूमी आहे.

[00:51.31] येथे आलेला कोणीही जीवंत बाहेर पडत नाही

[00:54.81] हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला.

[00:58.86] त्याच वेळी एका तेजोमयी योगिनी मातेचे तेथे आगमन झाले.

[01:03.13] तिचे नेत्र अग्नि सारखे लाल होते.

[01:06.06] तिच्या बरोबर आलेल्या योगिनींनी एका टोपलीत छिन्नमस्तादेवीला ठेऊन बरोबर आणले होते."

[01:12.16] तेंव्हा ती योगिनी माता म्हणाली, "यांना नेसायला साडी आणि चोळी द्या."

[01:17.74] तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्रे दिली

[01:20.66] आणि आमच्या वस्त्रांना तेथे प्रज्वलित केलेल्या अग्नि कुंडात घातले गेले.

[01:25.18] आम्ही साडीचोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला.

[01:29.69] आमचे पुरुषत्व नष्ट होऊ लागले.

[01:32.64] उरोज पुष्ट झाले, सारे पुरुषत्व नष्ट होऊन स्त्रीरूप प्राप्त झाले.

[01:38.21] आमचे नांव नविन प्रकाराने ठेवण्यात आले.

[01:41.40] माझे नांव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचे नांव धर्मम्मा असे ठेवण्यात आले.

[01:47.52] आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले. पिण्यास मदिरा दिली गेली.

[01:52.83] दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे

[01:57.35] संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते.

[02:01.38] परंतु या प्रमाणे देवता पूजा असते

[02:04.30] किंवा योगीजन केवळ संकल्पाने पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात

[02:09.08] असे आम्हास स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.

[02:11.76] आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करविण्यात आले.

[02:15.25] तेवढ्यात योगिनी माता म्हणाली

[02:17.91] "कबंध मुनि हे परिवर्तनशील जगताचे अधिपति आहेत.

[02:21.89] परिवर्तन शक्तिलाच "छिन्नमस्ता देवी" असे म्हणतात.

[02:26.41] या जगतात वृद्धि आणि क्षय सर्वदा चालूच असतो.

[02:30.39] क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो

[02:34.37] त्यावेळी भुवनेश्वरी देवीचे प्रागट्य होते.

[02:38.11] या उलट क्षीणत्व अधिक होऊन विकास वृद्धि कमी झाल्यास

[02:42.36] 'छिन्नमस्ता देवीचे प्राधान्य असते. या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे.

[02:49.02] एके वेळी पार्वती देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती.

[02:54.60] स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली त्यामुळे त्या कृष्णवर्णा झाल्या.

[03:00.75] भोजनाची याचना केली तेंव्हा पार्वती देवीने थोडे थांबण्यास सांगण्यात आले.

[03:06.59] थोडा वेळ झाल्यावर सखींने पुन्हा एकदा जेवणाची मागणी केली.

[03:10.84] या वेळी सुद्धा तिला थोडे थांबण्यास सांगण्यात आले.

[03:14.57] असे अनेक वेळा झाले तेंव्हा मात्र पार्वती देवीने आपल्या खड्गाने मस्तक तोडून टाकले.

[03:20.41] त्यावेळी कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या.

[03:24.39] दोन धारा तिने दोघी सखींना पिण्यास दिल्या आणि एका धारेचे स्वतः प्राशन केले.

[03:30.77] मस्तक छेदन केल्यामुळे तिला छिन्नमस्ता म्हणतात.

[03:34.48] अर्धरात्री केलेली छिन्नमस्तादेवीची उपासना फार चांगले फळ देते.

[03:39.80] शत्रूवर विजय मिळविण्यासाठी, शत्रुच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी,

[03:45.38] राज्य प्राप्तिसाठी, दुर्लभ अशा मोक्ष प्राप्तिसाठी तिची उपासना अत्यंत फलदायी ठरते.

[03:52.55] चारी दिशा या महामायेची वस्त्रे आहेत.

[03:55.47] तिच्या नाभीस्थानात योनिचक्र असते.

[03:58.43] कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण.

[04:03.21] या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्या बरोबर सतत असतात.

[04:08.01] तिने आपले शिर खंडन केले तरी सुद्धा ती सजीवच राहिली

[04:12.51] याचा योग भाषेत असा अर्थ होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचे प्रतिक आहे.

[04:18.62] अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्तादेवीचे ध्यान योगीजन करीत असतात.

[04:24.74] ही हिरण्यकश्यपूची उपास्य देवता आहे.

[04:27.92] आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव होता.

[04:32.45] इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली.

[04:35.12] चित्र- विचित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले.

[04:38.57] यात प्रामुख्याने वाघाच्या डरकाळयांनी आमचा थरकाप झाला.

[04:42.54] वाघाच्या आवाजाने तो शांत असलेला आसमंत एकदम दणाणून जात होता.

[04:47.59] दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असे योगिनी गणांना वाटले.

[04:52.37] त्यांच्या सांनिध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणे अत्यंत श्रेयस्कर आहे

[04:57.70] असे त्यांना वाटले. आमच्या डोक्याला त्यांनी कडुलिंबाची पाने बांधली.

[05:02.50] कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला.

[05:05.16] चांगल्या धारदार चाकूने आमचा शिरच्छेद करण्यात आला.

[05:08.89] रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या पाहून योगिनी गणांना आनंद झाला.

[05:14.47] मदोन्मत्त होऊन त्या रक्तपान करू लागल्या.

[05:17.66] आमची शिरे एका बाजूस आणि धड एका बाजूस टाकण्यात आले.

[05:22.17] तरी सुद्धा आम्ही सजीवच असल्या प्रमाणे वाटत होतो.

[05:25.62] शरीराचा दाह मात्र असहनीय होता.

[05:29.09] त्या योगिनी गणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्र विद्येला आम्ही बळी पडलो होतो.

[05:35.20] तेवढ्यात आम्हास गाढ झोप लागली. त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट

[05:39.99] अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोत दिसला.

[05:43.17] तो प्रकाश आम्हास जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे

[05:46.09] योगिनी गणाच्या वाऱ्यात मिसळून गेल्या प्रमाणे वाटला.

[05:49.81] आमची शिरे पुन्हा आमच्या धडांना येऊन चिटकली असे वाटले.

[05:53.79] आम्ही नेहमी प्रमाणे झोपेतून जागे झालो.

[05:56.72] आमच्या अंगावर साडी, चोळी होती.

[05:59.37] नंतर आमची स्त्री लक्षणे हळू हळू लोप पावू लागली.

[06:03.36] आणि पुरुष लक्षणे स्पष्ट होऊ लागली.

[06:06.32] रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्रे दग्ध होऊन

[06:09.77] आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली.

[06:12.97] स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली.

[06:16.43] एवढ्यात एक वाटसरू आमच्या मध्ये येऊन मिळाला.

[06:19.64] तो आम्हास म्हणाला

[06:21.50] "मित्रानो, काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे.

[06:26.84] तुमच्या शरिरातील 'स्त्री' तत्त्व अत्यंत शुद्ध करण्यात आले.

[06:30.82] प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्त्व अशी दोन्ही तत्त्वे असतात.

[06:35.07] या दोन्ही तत्त्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगशक्ति, विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही.

[06:41.97] तुमच्यातील विश्वचैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे.

[06:46.49] आत्म्याला स्त्री, पुरुष असा भेद नसतो.

[06:49.42] तो या दोन्ही तत्त्वांच्या आधाराच्या अतीत आहे."

[06:52.60] तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने

[06:58.72] अनुपमेय अशी करूणा प्राप्त करून घ्याल.

[07:01.66] कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी सुषुम्नामार्गाची तुम्हाला ओळख झाली.

[07:08.03] यापेक्षा महान भाग्य ते कोणते ? एवढे महाभाग्य प्राप्त होण्याचे कारण म्हणजे

[07:13.88] तुमच्या जवळ असलेल्या श्रीपादप्रभुंच्या चर्मपादुकाच होत.

[07:18.13] चर्म देहातील चैतन्यातून निघून तुम्ही चैतन्य प्रवाहरूप असलेल्या दिव्यत्वाच्या अनुसंधानात आहात.

[07:25.30] श्रीपाद प्रभुंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात.

[07:29.02] त्या इतर सर्वासाठी अति अगम्य, अद्भूत आणि चमत्कारपूर्ण असतात.

[07:35.13] ।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।