Lrc Player

Adhyay_40

Shreepad Shreevallabh Charitramrut
[08:53.55]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.67] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.52] अध्याय - ४०

[00:11.11] भास्कर शास्त्रीं, शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव

[00:15.63] आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो.

[00:19.08] कधी पायी, कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडा गाडीने

[00:23.87] असा आमचा प्रवास चालू होता.

[00:25.75] असा प्रवास करीत करीत त्रिपुरांतक क्षेत्री येऊन पोहोचलो.

[00:29.74] तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले.

[00:32.93] या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले.

[00:36.11] आमच्या जवळ श्रीपाद प्रभुंच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना

[00:41.96] श्रीचरण सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत असे.

[00:45.95] आम्ही पाऊले टाकीत असताना ती पाऊले आमची नसून

[00:49.94] श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पाऊले टाकीत असल्यासारखे वाटे.

[00:54.99] आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे.

[01:00.30] श्रीपाद प्रभूच आमच्या द्वारे बोलत असल्याचे जाणवे.

[01:04.02] आम्ही जेवण करीत असताना.

[01:06.41] ते आमच्या मुखानेच भोजन करीत असल्याचा भास होत असे.

[01:09.60] आमच्या शरीरातील मांस, रक्त नाड्यामधून

[01:12.79] श्रीप्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे.

[01:16.24] शास्त्रातील, “जीवात्माच परमात्मा आहे" हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो.

[01:21.60] परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभुंचेच चैतन्य भरून आहे

[01:27.44] याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता.

[01:32.80] या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती.

[01:38.38] श्रीत्रिपुरांतकेश्वराच्या अर्चकस्वामींचे नाव भास्करशास्त्री असे होते.

[01:43.96] त्यांना आमचा फारच अभिमान होता. ते पीठिकापुरम्ला वास्तव्यास होते.

[01:49.27] अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ति झाली होती.

[01:52.46] ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते.

[01:55.91] श्रीपीठिकापूर निवासीनी, कुक्कुटेश्वर महाप्रभूची स्वामिनी

[02:00.43] श्रीराजराजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्रदिक्षा दिली होती.

[02:04.94] आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथि म्हणून रहावे अशी आम्हास त्यांनी विनंती केली.

[02:10.79] आमच्या जवळ श्रीपाद प्रभुंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते.

[02:15.03] त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या.

[02:18.49] त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले

[02:22.97] "बाळानो तुम्ही केवढे धन्य आहात.

[02:25.95] या पादुकांची भास्करशास्त्री पूजा करीत असत.

[02:29.40] या पादुका सध्या ताम्ररूपात आहेत.

[02:32.32] भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने

[02:35.51] त्या पादुका कांही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील.

[02:40.29] हिरण्यलोकातील कांही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्यलोकात नेऊन

[02:45.35] अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका

[02:48.83] कारण लोकांत असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या.

[02:52.04] त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशिर्वाद देतो.

[02:57.09] त्यानंतर हिरण्यलोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशिर्वाद देतो.

[03:01.88] त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धि मिळते.

[03:05.63] यानंतर या पादुकांची अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन

[03:11.49] माझ्या जन्म स्थानी पीठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून

[03:16.54] जमीनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील.

[03:20.26] तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग माझी दर रोज अर्चना करतील.

[03:25.59] याच्या समवेत चौसष्ट हजार योगिनी असतील.

[03:29.07] त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील.

[03:32.80] मी तेथे ऋषी संघटने बरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून

[03:37.86] सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन.

[03:40.55] या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृष्य आणि अगोचर असलेले

[03:45.34] अजून एक स्वर्ण पीठिकापूरम आहे.

[03:47.99] हे योगदृष्टी असलेल्या भक्तानांच अनुभविता येते.

[03:51.44] माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत

[03:55.16] त्या ठिकाणीच पीठिकापुरम प्रतिष्ठापित होईल.

[03:58.11] या साठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात रहा.

[04:01.56] भविष्यात अनेक चित्र-विचित्र घटना घडणार आहेत.

[04:05.28] माझ्या महा संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्त गणांची मुंग्यासारखी रांग लागेल"

[04:11.39] ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो.

[04:15.95] अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रूपात होऊ लागला.

[04:20.20] अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळाले नाही.

[04:24.43] श्रीभास्कर शास्त्री षोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते.

[04:29.47] मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली.

[04:35.05] श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खाण

[04:39.57] ते म्हणाले, "हे बंधुनो, राजराजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन

[04:47.00] यापुढे विशाल सीमा ओलांडून पलिकडे जाणार आहे.

[04:50.46] राजराजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन

[04:55.24] मेधा शक्तित परिवर्तित होईल तसेच आपली बुद्धि विवेकपूर्ण होण्यासाठी

[05:00.57] ती महामाता आपणास सहाय्य करेल.

[05:03.49] आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मुलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल.

[05:08.29] साधारण पणे शक्ति आणि विवेक एकाच व्यक्तित एकत्रित दिसत नाहीत.

[05:13.60] परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ति आणि विवेक

[05:18.91] दोन्ही एकाच व्यक्तिमध्ये नांदतात. दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात

[05:24.23] ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते.

[05:28.00] विश्वातील विशाल भावांची वृद्धि करण्यास

[05:31.19] श्रीराजराजेश्वरीदेवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते.

[05:35.70] अत्यंत अद्भूत असे दिव्य ज्ञान मिळविण्यासाठी,

[05:39.16] शाश्वत अशी दिव्य मातृशक्ति मिळविण्यासाठी,

[05:42.61] विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी, तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे.

[05:48.48] श्रीराजराजेश्वरीदेवी अनंत अशा विवेकाची खाण आहे.

[05:52.73] तिने कांही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते.

[05:57.53] तिला अगम्य असे या विश्वात काहींच नाही.

[06:00.21] सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य,

[06:05.78] या प्रपंचातील प्रत्येक धर्म, त्याला संबंधित योग्य असा काळ,

[06:10.90] या सर्व गोष्टी राजराजेश्वरीदेवीच्या स्वाधीन असतात.

[06:14.88] तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते.

[06:18.11] तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेषभावना नसते.

[06:22.63] साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात

[06:26.08] त्याना ती विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्विकारते.

[06:31.13] ही राजराजेश्वरीची शक्ति वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने

[06:36.18] विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात.

[06:39.10] ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते.

[06:42.55] ती विश्वात कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता

[06:46.01] म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते.

[06:48.93] ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावा प्रमाणे,

[06:52.95] गरजे प्रमाणे आपला व्यवहार ठेवते.

[06:55.61] ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही.

[06:59.34] साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगति पथावर चालविते.

[07:05.47] अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गानेच जाऊ देते.

[07:08.65] त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून

[07:12.11] त्यांच्या अपराधाबद्दल त्याना क्षमा करते.

[07:15.29] ते चांगले वागोत अथवा वाईट वागोत ती त्यांच्या कडे दुर्लक्ष करते.

[07:20.61] तिची करुणा अनंत आहे. ती या संसाररूपी सागरातून तारून नेणारी आहे.

[07:26.45] तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत.

[07:32.87] राक्षस, असुर, पिशाच या सर्वानाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागविते

[07:38.43] तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो.

[07:43.23] परमात्म्याने आज्ञापिलेला मार्ग ती कोणत्याहि परिस्थितीत सोडत नाही.

[07:47.75] ती प्रयोगात आणते त्या शक्तिचे ज्ञान केंद्र ती स्वतःच असल्याने

[07:52.27] आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास "सत्यज्ञान बोध" होतो.

[07:57.56] राजराजेश्वरी देवीची शक्ति प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता,

[08:03.43] सत्यशोधन या सारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे.

[08:07.95] यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल.

[08:11.67] मी पीठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभुंच्या कृपेस पात्र झालो.

[08:17.51] तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली.

[08:23.62] आज माझा दीक्षा दिन आहे. आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस

[08:28.68] तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस.

[08:32.14] श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पीठिकापुरमहून निघून संचार करण्यास जातील,

[08:36.93] हे मी तुम्हाला उद्या सांगेन.

[08:39.32] तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा घेतला.

[08:44.92] हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्य व्हा."

[08:48.47] ।। श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।