Adhyay_49
[00:03.19] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:09.28] अध्याय -४९
[00:11.67] श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान
[00:15.40] तेहतीस (33) संख्या विशेष - कुरुगड्डीतील श्रीपादाचे कार्यक्रम
[00:20.71] श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले
[00:23.38] "शंकरभट्टा ! आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्नि विद्या आहे.
[00:28.43] अग्नि उपासना करणे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे
[00:33.21] विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे."
[00:36.13] यावर मी श्री प्रभूंचा जयजयकार करून म्हणालो,
[00:39.58] "महाराज माझ्या जीवनानंतर सुध्दा ही शेगडी अशीच राहणार आहे."
[00:44.10] यावर श्रीपाद प्रभू म्हणाले "तुझ्या विझलेल्या शेगडीत स्वत:ची शक्ति नाही.
[00:49.98] माझ्या योगशक्तिने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन
[00:54.48] भक्तांची दैन्य, दु:ख हरण करीत आहे.
[00:57.42] ही शेगडी अजून नऊ वर्षे पर्यंत पेटणार आहे.
[01:00.33] म्हणून मी तेहतीस (33) वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो.
[01:03.51] त्यानंतर तीन वर्षे पर्यंत तेज स्वरूपात राहून
[01:06.97] श्रध्दाळू भत्तचनांच दर्शन देत होतो.
[01:09.90] तेंव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो.
[01:12.57] योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात.
[01:16.81] रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे." श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले,
[01:22.14] "आपला अग्नियज्ञ यानंतर सुध्दा चालूच राहील.
[01:25.60] कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतिक म्हणून
[01:29.05] अग्नि आराधना करायची असते.
[01:31.14] यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते,
[01:36.19] त्या पूर्वी कारणरूप देह हा कारण शरीरात असतो.
[01:39.91] यामुळे तेहतीस वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते.
[01:45.83] त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्याची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून
[01:50.10] आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात.
[01:54.34] माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून
[01:57.27] आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षे पर्यंत चालेल.
[02:01.26] त्यानंतर या स्थूल रूपात अग्नीपूजा करण्याची आवश्यकता नाही.
[02:05.79] पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे.
[02:10.57] तसेच जलयज्ञ सुध्दा मी सुरु केला आहे.
[02:13.76] तो सुध्दा मोठ्या थाटात साजरा होत आहे.
[02:16.42] आता अग्निपूजा आणि अग्नि यज्ञाची सुरवात करायची आहे.
[02:20.67] तो यज्ञ सुध्दा अप्रतिम होईल यात शंकाच नाही.
[02:24.39] समस्त जीव राशीतील अग्निस्वरूप माझेच आहे.
[02:27.84] सर्वांचे शुध्दिकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुध्दा मीच आहे.
[02:33.15] पंचतत्वा संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही.
[02:38.20] एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते.
[02:42.72] त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली.
[02:47.23] त्या आदेशानुसार ती दोघे पती, पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली.
[02:52.54] परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला.
[02:55.99] या अकस्मात मृत्युने ती नववधु अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली
[03:02.37] "प्रभु आपल्या भक्तांचे रक्षण करतात
[03:05.03] आणि त्यांची कृपा दृष्टी सर्वावर असते असे ऐकले होते.
[03:08.48] परंतु आज तर हे अघटितच घडले" ती दु:खाने रडू लागली.
[03:12.99] त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले.
[03:16.98] त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वाना पडला.
[03:21.52] श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही
[03:26.57] असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले.
[03:29.76] तेवढयात श्रीपाद प्रभू दरबारात आले.
[03:32.41] शोक सागरात बुडालेल्या त्या नववधूने
[03:35.07] श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली.
[03:39.06] श्रीपाद प्रभू म्हणाले "कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते"
[03:43.83] यावर ती नववधू मोठ्या श्रध्दायुक्त भावाने म्हणाली
[03:47.82] "प्रभो ! या विश्वात आपणास अशक्य असे काहींच नाही.
[03:51.81] माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दु:खातून सोडवा"
[03:55.79] त्या नववधूला श्रीपाद प्रभूच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता.
[04:01.63] मृतजीवास जीवनदान
[04:04.56] श्रीपाद प्रभु म्हणाले "तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल .
[04:09.87] माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रध्दा भावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल.
[04:14.92] कर्म सिध्दांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो.
[04:18.90] तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणुन
[04:23.15] त्या लाकडांवर स्वयंपाक कर.
[04:25.54] चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल."
[04:30.06] श्रीपादांच्या सांगण्या प्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच
[04:33.74] तो तरूण झोपेतून उठल्या प्रमाणे उठून उभा राहीला.
[04:37.20] आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून
[04:39.59] त्या नववधूच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
[04:42.77] सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जयजयकार केला.
[04:47.02] दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा
[04:51.81] एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला.
[04:56.62] तो परिस्थितीने एवढा गांजला होता की,
[04:59.55] श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता.
[05:04.85] श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला.
[05:07.59] त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून
[05:09.71] त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला.
[05:12.63] त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली
[05:15.56] व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले
[05:19.81] "अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास.
[05:24.06] मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस.
[05:28.84] त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने
[05:32.29] या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली.
[05:35.21] आता तुला दारिद्रयापासून मुक्तता मिळेल."
[05:37.89] असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन
[05:42.93] पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले.
[05:46.39] प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले.
[05:51.43] घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहीले तो काय आश्चर्य
[05:55.42] ते लाकूड सोन्याचे झाले होते.
[05:57.81] अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती.
[06:03.12] श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नि यज्ञाने दहन केले होते.
[06:07.64] कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी भोपळा
[06:10.83] अशा फळभाज्या आणण्यास सांगत.
[06:12.95] त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत.
[06:17.75] अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत.
[06:22.00] यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत.
[06:24.92] एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली.
[06:28.91] तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला कुज दोष (मंगळ दोष) असल्याने
[06:34.48] प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला.
[06:37.14] त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले.
[06:42.45] त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन
[06:46.45] तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला.
[06:49.35] श्रीपाद प्रभू कांही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत.
[06:53.88] तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत.
[06:58.13] घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास
[07:00.79] किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास
[07:03.97] त्याना श्रीपाद प्रभु दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी
[07:07.69] (सकाळी 10-30 ते 12-00) अंबिकेची पूजा करण्यास सांगत.
[07:12.49] श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला.
[07:16.19] त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लाऊन
[07:20.47] तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले.
[07:22.86] तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको
[07:26.04] असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला.
[07:31.89] एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी
[07:36.94] गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले.
[07:41.19] असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला.
[07:45.70] अशा किती तरी नवीन नवीन पध्दतीद्वारा
[07:48.63] श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मा पासून मुक्तता केली.
[07:52.61] या सर्व पध्दती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे.
[07:57.12] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
