Lrc Player

Adhyay_50

Shreepad Shreevallabh Charitramrut
[05:41.99]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.17] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.27] अध्याय -५०

[00:11.39] गुरुनिंदा केल्याने दारिद्रय प्राप्ति

[00:14.31] एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला.

[00:20.69] त्याच्या वेदना एवढया असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा

[00:25.47] आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले.

[00:28.39] नामस्मरण महिमा

[00:31.29] त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन

[00:33.95] आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारूण्य पूर्ण वाणीने प्रार्थना केली.

[00:38.73] तेंव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले

[00:41.38] "अरे विप्रा, तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविलेस.

[00:46.44] अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस.

[00:50.68] त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधि जडली आहे

[00:55.73] मानवास या कलियुगात वाकदोषा पासून मुक्त होण्याचा

[00:59.71] "नामस्मरण" हा एकच मार्ग आहे.

[01:02.37] भगवंताच्या नामस्मरणांने वायुमंडळ शुध्द होते.

[01:06.67] मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरवात करणार आहे.

[01:10.65] त्या नामाबरोबर "श्रीकार" ही जोडणार आहे.

[01:13.58] यामुळे चिरस्थायीपणे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी

[01:18.65] अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त

[01:22.37] "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" आणि "श्रीदत्ता दिगंबरा"

[01:28.22] असे मन:स्फुर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभ पणे प्राप्त होऊन

[01:33.80] त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन."

[01:36.74] त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस

[01:40.72] तीन रात्री कुरुगड्डी येथे राहून "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

[01:46.59] असा जप करण्यास सांगितला.

[01:48.68] या आदेशा प्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस

[01:52.43] व तीन रात्री कुरुगड्डीस राहिला

[01:54.82] व अत्यंत श्रध्दाभावाने त्याने जप केला.

[01:57.74] त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली.

[02:00.66] श्रीपाद म्हणाले, "वायुमंडलास आज पूर्वीसाखेच वाग्जल भरून आहे.

[02:06.24] आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज, तम

[02:10.75] या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते.

[02:15.54] या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो.

[02:19.79] ही पंचभूते दुषित झाली की संपूर्ण अंतराळ दुषित होते.

[02:24.30] यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो.

[02:28.29] या दारिद्रयामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते.

[02:31.74] या पापामुळे मन दूषित होऊन दान, धर्म लोकसेवा

[02:35.99] अशी सत्कर्मे त्याच्या कडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्रय येते.

[02:40.24] हे दुष्ट चक्र असे चालूच राहते.

[02:43.16] त्रिकरण शुध्दीची आवश्यकता

[02:46.35] मानवास दारिद्रयापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ति हवी असल्यास

[02:51.66] त्याचे काया, वाचा, मन शुध्द असावयास हवे.

[02:55.38] यालाच त्रिकरण शुध्दि असे म्हणतात.

[02:58.30] आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे.

[03:01.75] मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा.

[03:07.60] आपल्या वाणी प्रमाणेच आचरण सुध्दा अगदी पवित्र असावे.

[03:11.58] त्रिकरण शुध्दि पावलेला मानव महान पदाला जाऊन पोहोचतो.

[03:15.57] मनात एक असणे, वाणीतून दुसरेच उच्चारण करणे

[03:19.29] आणि या दोहो पेक्षा वेगळेच आचरण करणे

[03:21.92] अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात.

[03:24.86] या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत.

[03:30.18] यात "नामस्मरण" हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे.

[03:33.90] नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधूर असते.

[03:37.62] नामस्मरण न करणाऱ्याचे मन सुध्दा अशुध्द असते.

[03:41.07] नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.

[03:45.87] कर्म विमोचन

[03:48.26] एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरवपुरला आला.

[03:51.98] त्याला मधुमेहाचा आजार आणि त्या बरोबर दुसऱ्या अनेक व्याधी होत्या.

[03:56.50] त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला.

[03:59.68] तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता.

[04:02.87] त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते.

[04:08.46] एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती.

[04:13.51] ती या दुष्ट चोराने हिराऊन नेली.

[04:16.17] त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही.

[04:19.35] वर दक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही.

[04:23.61] शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणे शिवाय लग्नास तयार झाला.

[04:27.86] या विवाह प्रस्तावामुळे त्या तरूण उपवर कन्येने आत्महत्या केली होती.

[04:33.17] पूर्वजन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षय रोगी

[04:36.62] अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला

[04:39.80] आणि त्याने मोठ्या कारूण्यपूर्ण वाणीने

[04:42.73] श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली.

[04:46.98] दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंचपहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले.

[04:52.30] तेथे डासांचा अत्यंत त्रास होता.

[04:55.22] तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी सुध्दा नव्हते.

[04:58.14] त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले.

[05:00.79] त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले.

[05:04.78] तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिले

[05:07.70] आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला.

[05:11.39] त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून

[05:16.17] त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला.

[05:19.36] या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्म फलाचा परिष्कार होऊन

[05:22.81] तो आपल्या क्षय रोगापासून व दुसऱ्या व्याधिपासून मुक्त होऊन निरोगी झाला.

[05:28.12] अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास

[05:31.57] श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले.

[05:36.09] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥