Adhyay_51
[00:03.46] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
[00:09.58] अध्याय -५१
[00:11.17] जलोदरा पासून रक्षण-ग्रंथ पारायण महिमा
[00:15.43] मी कुरवपुरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली.
[00:19.14] त्या दिवशी हस्त नक्षत्र होते.
[00:21.53] कृष्णानदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले.
[00:26.05] ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले.
[00:30.56] त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो.
[00:34.81] तेंव्हा प्रभू म्हणाले "अरे शंकरभट्टा !
[00:39.06] मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे
[00:41.99] मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरवपुरात गुप्त रूपाने संचार करीन
[00:47.61] नंतर नृसिंहसरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उध्दारासाठी अवतार घेईन.
[00:53.67] तू लिहीत असलेला "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ," महापवित्र ग्रंथ
[00:58.45] भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो 'अक्षर सत्य' ग्रंथ असेल."
[01:04.02] "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा"
[01:08.27] या माझ्या नांवाचा जयघोष सर्वत्र होईल.
[01:11.72] या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल.
[01:15.97] इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल.
[01:19.16] या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल.
[01:24.20] तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ
[01:26.86] माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील.
[01:32.18] तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील.
[01:37.22] हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल
[01:41.20] त्यांना माझे दर्शन अवश्य होईल.
[01:43.86] मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो.
[01:47.84] तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद केला जाईल
[01:51.86] तो बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल.
[01:57.17] या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील.
[02:00.36] या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता
[02:04.88] दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन
[02:10.19] त्याचे सकल व्याधिपासून रक्षण होईल.
[02:13.38] भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभय वचन
[02:17.10] श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले
[02:20.55] "तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन
[02:25.33] मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस.
[02:29.31] मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे.
[02:32.77] मी नाही म्हणून तू दु:खी होऊ नकोस.
[02:35.42] तू तीन वर्षे येथेच रहा.
[02:37.81] या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन.
[02:41.80] तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन."
[02:45.78] श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान
[02:48.97] "हे शंकरभट्टा ! तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस
[02:54.28] तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव .
[02:59.86] त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील.
[03:03.84] सर्वाना माझे मंगलमय आशिर्वाद.
[03:07.03] श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले.
[03:13.14] त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून,
[03:16.33] आई पासून दुरावलेल्या निरागस बालका सारखा स्फुंदुन स्फुंदुन रडू लागलो.
[03:21.64] श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय
[03:24.03] ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले
[03:27.22] आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो.
[03:29.87] तेंव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले.
[03:35.72] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
