Lrc Player

Adhyay_53

Shreepad Shreevallabh Charitramrut
[01:48.05]·Synced by Guest·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:03.50] ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

[00:09.65] अध्याय -५३

[00:11.78] श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचे

[00:14.96] पीठिकापुरम पोहोचण्याचे विधान - ग्रंथाचे वैशिष्टय

[00:19.74] मी लिहिलेला "श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत" ग्रंथ थोडे दिवस

[00:24.79] श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता.

[00:27.16] त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला.

[00:31.68] तेलुगु भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला.

[00:37.26] गंधर्वानी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला .

[00:43.10] त्याचे सिध्दयोग द्वारा पठन होत आहे.

[00:46.29] मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकाजवळ ठेऊन

[00:50.80] मी त्यांना वाचून दाखविले.

[00:52.93] ऐकण्यास आलेले पांच भक्त ते श्रवण करून धन्य झाले.

[00:57.18] मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल

[01:01.69] ते सांगु शकत नाही. श्री बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात

[01:07.27] या ग्रंथाची तेलुगु भाषेतील प्रत उदयास येईल.

[01:10.72] ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला

[01:14.18] त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन

[01:16.86] तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून

[01:20.84] हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा.

[01:24.29] या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास

[01:29.33] गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल.

[01:32.26] तो प्रसाद आणून देणारी व्यक्ति

[01:34.64] बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढितील असेल.

[01:37.56] हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे.

[01:42.37] ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥