Lrc Player

Sunya Sunya

Unknown artist
[05:15.25]·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:14.99] LYRICS

[00:15.46] LISTEN

[00:16.23] PEOPLE ALSO SEARCH FOR

[00:26.48] शेतीबागा माडाची गं वाडी

[00:32.72] नवरीला घुंगराची गाडी

[00:39.48] जशी राजा-रानीची गं जोडी

[00:45.48] नवरीला चांदण्याची साडी

[00:51.99] सुन्या-सुन्या मनामध्ये, सूर हलके

[00:58.97] नव्या-जुन्या आठवणी, भास परके

[01:04.70] दारी सनईचे सूर

[01:08.24] दाटे मनी हूर हूर

[01:11.23] चाले विरहाचा पुढे वारसा

[01:18.97] फुलमाळा मंडपाच्या दारी

[01:24.71] झालरींना सुखाच्या किनारी

[01:31.49] नवी नाती ओळखीची सारी

[01:38.23] सपनांची दुनिया गं न्यारी

[02:17.48] भावनेची तोरणे, वेदनेच्या झालरी

[02:24.25] नाद करिती चौघडे, वाढते घुसमट उरी

[02:36.98] ओळखीचे चेहेरे, मी अनामिक एकटी

[02:44.23] संपले सारे दुवे, अन आस ही सरली...

[02:53.47] गाव माझा दूर, आला आसवांचा पूर

[02:59.73] प्रेम नव्याने देई यातना

[03:06.48] हळदीने सजली गं काया

[03:13.73] सासरची मिळेल गं माया

[03:19.95] वेड लावी धन्याची गं भेट

[03:25.96] डोळ्यातल्या काजळाची तीट

[03:53.23] आठवांचे कुंचले, रेखिती काटेकुटे

[03:59.73] कोरडे तळहात हे, मेंदीची वर जळमटे

[04:12.46] मोकळ्या माथ्यावरी, देवळाची पायरी

[04:19.24] फितूर झाली दैवते, रीत ही कुठली...

[04:28.48] हे दैव मानी हार, आली बंधनाला धार

[04:34.71] भोवती निराशेचा उडे पाचोळा...

[04:42.48] शेतीबागा माडाची गं वाडी

[04:48.48] नवरीला घुंगराची गाडी

[04:54.96] जशी राजा-रानीची गं जोडी

[05:01.49] नवरीला चांदण्याची साडी