Lrc Player

Atach baya ka baavaral

Ajay-Atul
[05:39.34]·Synced by Pranav Kapale·
This lyric sheet isn't paired with a song yet, so lines are shown but won't sync or seek.

[00:02.86] हळद पिवळी, पोर कवळी, जपून लावा गाली

[00:09.86] सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली

[00:16.60] हे गजर झाला दारी, साजनाची स्वारी

[00:23.85] साजनाची स्वारी आली लाज गाली आली

[00:37.32] जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाई झुरलं

[00:45.87] उधळलं गं समदं बाई हातात न्हाई उरलं

[00:52.11] जीव जडला पर न्हाई नजरंला कळलं

[00:58.64] किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं

[01:05.86] आताच बया का बावरलं

[01:14.17] खरंच बया का घाबरलं

[02:04.16] साद तू घातली, रान पेटून आली

[02:12.39] कावरी बावरी लाज दाटून आली

[02:19.67] पाहीलं गुमान बाई

[02:23.64] घ्येतलं दमानं बाई

[02:27.17] च्येतलं तुफान साजना

[02:34.16] बेभान झाले साजना

[02:40.41] नजरंला नजरंचं नजरंनं कळलं

[02:47.16] मन ईवलं इरघळलं अन् नातं जुळलं

[02:54.19] आताच बया का बावरलं

[03:04.24] खरंच बया का घाबरलं

[03:23.46] मन झालं धुंद, बाजिंदं, ललकारी गं

[03:31.21] पिरतीचा गंध, आनंद नवलाई गं

[03:38.21] लागली ओढ

[03:45.96] लागली ओढ, मन हे लई द्वाड

[03:52.47] सतवून झालं समदंच ग्वाड

[03:59.21] लागलं सजनीला सजनाचं याड

[04:16.46] झालीया भूल ही उमजली या मनाला

[04:24.46] परतूनी घाव हा लागला रं जीवाला

[04:31.47] डोळं झाकलेलं बाई

[04:35.46] रेघ आखलेलं बाई

[04:38.96] मागं रोखल्यालं साजना

[04:45.96] उधळून ग्येलं साजना

[04:51.94] हारलंया पिरमाला पिरमानं जिकलं

[04:58.94] झगडुनी मन माझं, आदबीनं झुकलं

[05:05.69] साजना तू सावरलं