[00:16.09] हे, काळी धरती नांगरलेली, आली रं पेरणी
[00:27.58] धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी हा
[00:45.61] हे, काळी धरती नांगरलेली, आली रं पेरणी
[00:56.86] धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी
[01:06.85] चिंब होऊ दे धरनी
[01:09.58] रान सारं आबादानी
[01:12.08] जीव जळ खुळ्यावानी
[01:14.37] देवा किरपा करी
[01:17.87] धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी हा
[01:51.79] (हिरवाईचं दान नेसलं रान, भराला आज आलं जी)
[02:01.80] (मिरुगाच्या नादानं केली पेरन, जोमानं बरसू दे पानी)
[02:11.51] काळ्या आईची करनी तिला लेकराची माया
[02:16.38] माय होईल हिरवी गान हिरीताच गाया
[02:21.38] वरती आभाळाची हाये मला बापावानी छाया
[02:26.38] साद माझ्या काळजाची न्हाई जायची रं वाया
[02:31.14] माझ्या जीव्हाराचं सोन, येऊ दे रं अवदाच्यानं
[02:36.14] घाली पदरात दान, देवा किरपा करी
[02:40.88] धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी
[03:14.13] (हिरवाईचं दान नेसलं रान, भराला आज आलं जी)
[03:25.38] (मिरुगाच्या नादानं केली पेरन, जोमानं बरसू दे पानी)
[03:34.90] हे बीज रुजलं रुजलं माउलीच्या उदरात
[03:40.64] माझं शिव्हार आवार आज आलंया भरात
[03:45.38] सात जन्माची पुण्याई घातली तू पदरात
[03:50.38] माय भरल्या खुशीनं गोडं हसते गालात
[03:55.13] आलं डोळ्यामंदी पानी, जीव झाला खुळ्यावानी
[04:00.38] सारी तुझीच करणी, देवा किरपा करी
[04:04.89] धावत ये रं, काळ्या मेघा, किरपा आता करी
