Man udhan varyache
[00:05.77] मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
[00:11.77] नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:17.77] मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
[00:23.77] नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:29.53] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:35.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[00:41.52] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:47.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[00:53.27] मन उधाण वाऱ्याचे
[01:32.77] आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
[01:38.77] हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
[01:44.77] सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
[01:50.78] कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
[01:56.77] मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
[02:02.55] अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
[02:08.77] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:14.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[02:20.53] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:26.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[02:32.52] मन उधाण वाऱ्याचे
[03:12.02] रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
[03:18.02] कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
[03:23.52] तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
[03:29.77] कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
[03:35.52] जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
[03:41.52] भाबडे तरी भासांच्या मागून पळते
[03:48.03] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[03:53.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[04:00.03] मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[04:05.77] का होते बेभान, कसे गहिवरते
[04:11.27] मन उधाण वाऱ्याचे
